Saturday, 7 July 2018

अभंग

अभंग

विठ्ठू माऊली तू
माऊली जगाची
माऊलीत मुर्ती विठ्ठलाची....
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

माय माझी रुखूमाई
बाप माझा पांडूरंग
तुझ्या भेटीसाठी देवा
गात निघालो अंभग
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

तुझ्या रे दर्शनासाठी
निघालो रे अनवाणी
भुकेल्यांना मिळू दे रे
पांडूरंगा अन्नपाणी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

झाडे वेली पशूपक्षी
गातात तुझी रे गाणी
जैसा भासे पांडूरंग
चाले हवा वारा पाणी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

टाळ मृदंग चिपळ्या
चाले वाजवत गाणी
पंढरीची वाट चाले
वारकरी अनवाणी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

पताका ही खांद्यावर
घेवून नाचती वारी
भेट घडू दे रे देवा
आलो आलो तुझ्या दारी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

इंद्रायनीच्या या तीरी
आलो  तुझा वारकरी
कुठे उभा विटेवरी
पांडूरंग माझा हरी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

पांडूरंगा तुझ्या दारी
आलो घेवून ही वारी
आस लागली मनाला
भेट ना  एकदातरी
                        कवी
                 रामदास वाघमारे
               मो.8888125610

No comments:

Post a Comment