Saturday, 7 July 2018

पांडूरंग

पांडूरंग

आम्ही वारकरी
निघालो पंढरी
नाचे वाटेवरी
पांडूरंग

विठ्ठू नामाचा
गातो मी अभंग
नाचूनिया दंग
पांडूरंग

वाट पंढरीची
चाले वारकरी
तुका म्हणे जरी
पांडूरंग

ध्यास लागला रे
पांडूरंगा तुझा
वारी मध्ये गातो
पांडूरंग

आस ती लागली
तुझ्या या भेटीची
माळ तुळसीची
पांडूरंग

माय रुखमीनी
बाप पांडूरंग
गावूनी अभंग
पांडूरंग

टाळ मृदूंगाचा
नाद पांढरीत
नाचतो वारीत
पांडूरंग

एकची मागणे
सुखी ठेव देवा
स्वास माझा व्हावा
पांडूरंग

जगी माझा विठ्ठू
दिसे भजनात
माळ ती गळ्यात
पांडूरंग
                       कवी
                   रामदास वाघमारे
             मो.8888125610

No comments:

Post a Comment