Friday, 6 July 2018

शोधू तुला कोठे कोठे

*शोधू तुला कोठे कोठे*

*जिथ तिथे रुप तुझे*
*राधेसम भासू लागले*
*याड तुझ्या नावाचे*
*या हरीला लागले....*

*तुझ्या नामाचा तो गजर*
*कुणी भजनास आले*
*याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

*राधे राधे तुझे नाम*
*हरीच्या या मुखी आले*
*याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

*मुखी गाता तुझे नाम*
*गाता डोळे ओले झाले*
*याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

  *राधे तुझ्या दारी ग*
  *हरी भक्तगण आले*
  *याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

  *उघड दार भक्तीचे हे*
  *सावळाहरी दारी आले*
  *याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

  *नाम मुखी घेतो राधे*
  *गाण्यातून रामप्रहरी*
   *शोधू तुला कोठे कोठे*
    *भेट या हरीला एकदा तरी*

                    *✍  कवी*  
                  *रामदास वाघमारे*

No comments:

Post a Comment