Friday, 20 July 2018

खरे सांगा मला....!

*खरे सांगा मला....!*

असा कोण आहे बरे
या जगात नाही दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

एक असा दावा मला
पृथ्वी तलावर सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

किती कमविला पैसा
तरी अंतर मन दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

तुमच्या माझ्या पासून
टाटा अंबानी पर्यंत दुःखी
एक तरी आहे का हो
कुणी आजपर्यंत सुखी

ज्याचे त्याचे कर्म जैसे
तसे फळ त्याच्या मुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

संत कबिर सांगत
ज्यादा धन पायो दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

देव मानसात शोधा
मग तुम्ही आसाल सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी राहील का हो दुःखी

                              कवी
                      रामदास वाघमारे
               मो. 8888125610

No comments:

Post a Comment