Saturday, 7 July 2018

विठ्ठल नामाची

विठ्ठल नामाची...

विठ्ठल नामाची
दिंडी चालली
दिंडी चालतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
वारी सजली
वारी चालतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
गाणी गायली
गाणी ही गातांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
माळ घातली
माळ घालतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
ओढ लागली
ओढ लागतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
आस लागली
आस लागतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
भूक लागली
भूक लागतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
शाळा भरली
शाळा शिकतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली
                         कवी
                रामदास वाघमारे
             मो.8888125610

No comments:

Post a Comment