Wednesday, 4 July 2018

अरे माणसा माणसा....

*अरे माणसा माणसा...*

मी माणूस माणूस वाचतआहे
माणसात देव शोधत आहे
अरे माणसा माणसा तुला ह्दय
नसल्यागत तु का असे  वागत आहे...

निष्पाप कोवळ्या कळीला
कुसकरुन देह कुठे कुठे पुरत आहेस
अरे माणसा माणसा तुला ह्दय
नसल्यागत तु का असे  वागत आहेस...

वाल्ह्याचा वालमीकी झाला होतास
असे इतिहास वजा जमा आहे
अरे माणसा माणसा तुला ह्दय
नसल्यागत तु का असे  वागत आहे...

अरे माणसा तुझ्या क्रृर करमाची कहाणी
रोज वृत्तपञातून कानी पडत आहे
अरे माणसा माणसा तुला ह्दय
नसल्यागत तु का असे  वागत आहे...

असे ऐकून असे वाचून
मन माझे उदास होते आहे
अरे माणसा माणसा तुला ह्दय
नसल्यागत तु का असे  वागत आहे...

तु देखील आईच्या उदरातून
जन्म घेतलास
तसा मी देखील घेतला आहे
मग.. माणसा माणसा तुला ह्दय
नसल्यागत तु का असे  वागत आहे...
                    ✍ कवी
               रामदास वाघमारे
           संपादक जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment