जीवन गौरव शैक्षणिक मासिक: 🙏
*बाप* होता तुहा
*माय* म्हणे मही
तवा मला शिक्षणाची
चिंता नव्हती तुही.....
कवी
✍ रामदास वाघमारे
*बाप*
लहान पणापासून माईने मह्या
बापाचीच भिती दावली,
बाप मारीन तुला,अन् मला
असी भिती दावली.
काय कुणास ठाऊक
आजही लेकरं बापालाच
घाबरतात ,
बापाच्या भयाने शाळेत जातात
बापाने मारुनये म्हणून अभ्यास करतात.
बापाच्या दहशतीखाली घरातही भितभित राहतात,
मग पुढे......
मुलं बापाला दुर्लक्षून आईवर प्रेम करतात,
मग हळूहळू मनातून बापाला वजा करतात,
मुलं मोठे होता होता मग आईचेच मुलं गाणं गाऊ लागतात.
आईवर कवीता लिहू लागतात,
आईचीच शप्पत घेतात , आईवर शिव्याही देतात.
मला सागा कुणते मुले
बापाला दुधावरची साय म्हणतात,
लंगड्याचा पाय म्हणतात,
नाहीना मग .....
बापासाठी मुलांकडे शब्दच नसतात,
बाप घरात आला की लेकरं माईजवळ खेळतात.
लेखकांना देखील बाप नव्हता
शामची आईच होती
बाप फक्त नि फक्त मुलांच्या नावाच्या पुढे अन् आडनावाच्या मागे असतो फक्त नावापुरता,
बाप म्हणजे पैसे कमवण्याचे यंञ
आजही बाप मेल्यावर मुले का फुंदू फुंदू रडतात...?
का वाटतं मुलांना आभाळ फाटल्यागत..?
पाया खालची जमीन फाटल्यागत
का मुलं हंबरतात बाप मेल्यावर..?
सांगाना मला का मुलं घाबरतात बाप मेल्यावर ..?
कथा , कादंबऱ्या अन् कवीतेत नसलेला हा पत्थरदिल बाप जेंव्हा खरोखरच घरात नसतो ना तेंव्हा सर्व घर सुनंसुन दिसतं
तेव्हा वाटतं मुलांना की...!
बाप कुणाचा मरु नये...!
बाप कुणाचा मरु नये...!
बाप कुणाचा मरु नये...!
कवी
✍ रामदास वाघमारे
बाप
बैल पुढ बाप मागं
राबत होता मळ्यानं
कष्टतांना पाहीले मी
बाप माझा सालानं....
रक्त आपले जाळीता
नामवंतांच्या शेतातनं
झुरतांना पाहिले मी
बाप माझा सालानं
धनिकांच्या घरी-दारी
धन-धान्य रचतांना
इमानीला पाहीले मी
बाप माझा जागतांना
राञंदिस शेत धंदा
मुखी नाही एक दाणा
भुकेलेला पाहीला मी
बाप माझा झोपतांना
कवी
✍ रामदास वाघमारे
बाप
गायरान गायरान
गोरगरिबाची शानं
बाप नांगरतो बघा
दगडगोट्याचः रानं
गायरान वावरात
असे मुरमाचा थरं
तापलेल्या दगडांना
बाप सारी बांधावर
दुःखी कष्टी नजरेनं
बाप बघे ढगाकडं
येई अवकाळी पाऊसं
तवा बाप निघे घाराकडं
गायरान पेरताना
बी- बियाणे दिसे वरं
बाप झाकी बियाणाला
तवा मोड येई वरं
मोड येता वर वर
कापसाचं झालं झाडं
बोंड येता झाडावर
शेती लाल्या रोग पडं
दुःखी कष्टी नजरेनं
पाही न्याहाळून रानं
कर्ज आता फेडू कसं
या भितीनं
फासी घेतली रं बानं
✍ कवी
रामदास वाघमारे
बाप
रातच्याला वावरात
बाप बैलं चारायचा
स्वतःच्या सावलीलाच
न्याहाळतं बसायचा
मनामधी माझ्या बाच्या
इचार एक यायचा
सावलीला काहीतरी
सांगात बा बसायचा
डोळे चोळत पुसत
बाप बैलं हाकायचा
कर्जाचा इचार बाच्या
मनामधी घोळायचा
बैलाचा कासरा घेत
खांद्यावर टाकायचा
झाडाच्या फांदीला बाप
चाढीगाठ बांधायचा
कास-याचा फास बाप
गळ्याजवळ घ्यायचा
कर्जाच्या इचारा पिई
फासीलावून घ्यायचा
✍ कवी
रामदास वाघमारे
माझ्या या *बाप* कवितेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य संमेलनात व *ऐल्गार बाप काव्य प्रथम पुरस्कार*
बाप
बाप मोहा
राबराब राबला l
धनिकाच्या वावरात,
इमानदारीला जागला ll 2ll
मला माईला सोडून
एकटाच वावरात राहिला l
नशिबाला दोष देत,
दारे त्यो धरत राहिला ll2ll
तांबाडं फुटताच दावणीतनं,
बाप मोहा गडाबडून उठला l
शेण काढणं झालं की
उपाशीच वावरात निघाला ll3ll
सण असो सुगी असो,
वावरातच राहू लागला l
रोजचा त्याचा दिनक्रम,
असाच चालला ll 4ll
लेकराबाळाची आठवण आली की,
बाप मोहा मुळूमुळु रडला l
रागारागात बाप मोहा,
वळणंचीवळणं खणू लागाला ll5ll
मह्या शिक्षणासाठी,
सालं त्यो धरु लागला l
जसं जमंल तसं त्यो,
मला शिकवू लागला,
बाप मोहा राबराब राबाला ll6ll
✍ कवी
रामदास वाघमारे: बाप
पावसाच्या आधी बाप
घेई मोगड्याचं माप
बुरबुर पावसात
बी-बियाणं पेरी बाप
पेंड ओल्या पावसात
नसे घोंगता डोक्यातं
बाप काढतो वसनं
पेंड घुसे मोगड्यातं
पेरलेल्या बियाणाला
खाली गरमीची भापं
मोड येता वर वर
पावसानी दिली थापं
बाप घेई डोईवर
पाणी भरुन घागरं
पाणी पाजी घोट घोटं
तवा फुटती अंकुरं
आंकुरलेल्या कोंबाला
लाल्या,रोगराई पडं
सरकार सेवकाचं
येतं नसं त्याचं मडं
✍ कवी
रामदास वाघमारे
No comments:
Post a Comment