Monday, 16 July 2018

जीवन गौरवने आम्हाला काय दिले - शब्दधन डि.बि

*जीवन गौरवने आम्हाला काय दिले.*
                   शब्दधन डीबी,पुणे-३३.
       ( पुणे जिल्हा संपादक )
जे काय दिले ते आम्हाला जीवन गौरवनेच दिले.
असे मला म्हणायला आवडेल.जीवन गौरव म्हणजे उगवता सूर्य आणि प्रत्येकाच्या मनातील
चमचमता तारा आहे. मन जेव्हा काही विचार करते तेव्हा जीवन गौरव आठवतो. जीवन गौरव
या शब्दातच किती मोठी ताकद आहे.जीवन गौरव म्हणजे हलते-झुलते विचारपीठ तर आहेच
आहे...परंतू माणसे जोडणारे एक विद्यापीठ आहे
व त्या विद्यापीठाचा कुलगुरु माझा भाऊ वाघमारे
दादा आहे...दादा या शब्दातच खरे विचार व ताकद आहे...दादा म्हंटले की,माझे विचार पारच
लिन होतात व मायेचा पाझर फुटतो...दादा म्हंटल की, मला माझा सख्खा भाऊ सुरेश दादा
शिंदे आठवतो की, ज्या व्यक्तीने रयत शिक्षण संस्था सातारा येथे 'कमवा आणि शिका' या योजनेतंर्गत शिक्षण घेतले व पोलिस खत्यातील
ऑफसर सुप्रिडेट हे पद भूषविले...परंतु काळच्या ओघात दादावर काळानेच झडप घातली व चालता-बोलता ड्यूटीवर असतानाच
तो आम्हाला वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षीच सोडून गेला. तन मन आणि धनाने माझ्याबरोबर
असलेला तो स्त्रोत म्हणजे शब्दधन सुरेश दादा
शिंदे आमचे थोरले बंधू मला स्वतःच्या पायावरच
उभे करून गेले नाहीत तर त्यांनी माणसे जोडण्याचे तंत्रज्ञान मला देऊन गेले. अतिउच्च
शब्दात बोलायचे झाले तर दादा आज असता तर
म्हंटला असता,"डिगड्या,किती माणसे जमवल्यात...परंतु हात ओला तर मैतर भला असे कधीही वागू नकोस," तेच अभिवचन आज
जपतोय व फक्त निर्व्याज साहित्य सेवा करतोय
त्याच्या स्मरणार्थ... माणसे म्हणतात... शिंदे जवळ खूप पैसे आहेत.म्हणून तो हे सारे
नखरे करतो...परंतु तसे काही नाही हो,अतिशय
नम्रपणे सांगतो. माझी माणसे आणि माझी कविताच माझे दैवत आहे. शास्वत जगायला शिकवले मला या दोघांनीच. कविता ही आलीकडची बाब आहे,परंतु दादा मात्र फार जुने
बाळकडू आहे. किती जणांना किती मदत केली.
कशी मदत केली हे कधीही सांगणार नाही आणि
दिलेला शब्द कधीही मोडणार नाही. हेच ते बाळकडू जपत रहाणार व पुढे-पुढे जाणार...
आता फसगत कोण करणार नाही याची खात्रीच
नाही झाली तर आत्मविश्वासही वाढलाय माझा..
वाघमारे दादा व अख्खी जीवन गौरव टिम आणि
माझी शब्दधन जीवन गौरव काव्यमंच टिम सदैव
माझ्याबरोबर आहेत पाठीराखा म्हणून...कुणाची
स्तुती म्हणून नाही किंवा आत्मस्तुती म्हणून हे सारे लिहित मुळीच नाही...अंतकर्णातून आलेले
हे शब्दधन आहे. उगच खुळ्या मनाची समजुत घालण्यासाठी लिहिलेले हे शब्दधन नाही. मी
धनाने फार श्रीमंत आहे. असे मुळीच नाही, परंतु
मनाने निश्चितच श्रीमंत आहे. व्यथा माझी कुणालाच सांगत नाही व सांगणारही. दादा माझा
असता तर निश्चितच सांगितलीही असती,परंतु आज वाघमारे दादाच्या रूपाने ती उणीव भरून
निघाली म्हणून हा शब्द प्रपंच...
       जीवन गौरवने मला काय दिले नाही असे
विचारले असते तर मी काहीच सांगू शकलो नसतो,परंतु काय दिले हे सांगण्यासाठी ही माझ्याकडे काहीच नाही, "निशब्द आहे मी ढाण्या वाघ दादा तुमचा असेच म्हणेन...!' परंतु
दादाच्या आग्रहाखातर आणि तमाम वाचक बंधू
भगीनींना जीवन गौरवचा एक स्तभ म्हणून सांगणे आवश्यक आहे. दादा तुम्ही कराच आम्ही
पाठीशी आहोत असे म्हणणारी मंडळी जीवन
गौरव सोडून मला कुठेही मिळली नाहीत आणि
मिळणारही नाहीत. एकहाती जीवन गौरवचा
कारभार पहाणारे आणि आमचा विचार घेतल्याशिवाय पुढे न जाणारे दादा म्हणजे...ग्रेट
व्यक्तिमत्व... मला तर वयोवृद्ध होण्याच्या आगोदरच हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. दादांनी मला सेप्रेट शब्दधन जीवन गौरव
काव्यमंच देऊन टाकला आहे.यापलीकडे मी काहीच सांगणार नाही. सांगण्यापेक्षा कामातून
दाखवून देणार आहे. माणसाचे विचार जुळले
की मने जुळतात.येथे ना कुणाचा स्वर्थ ना फायदा. निस्वार्थ हा एकमेव उद्देश घेऊन सर्वच
माणसे जेव्हा नितळ मनाने एकत्र येतात तेव्हाच
काहितरी चांगले घडते.असे माझे स्वतःचेच मत
आहे.बाकी पैसापाणी, मानपान गौण आहे.तुम्ही
किती धनदौलत साठवता त्यापेक्षा किती माणसे
जोडता हे महत्त्वाचे आहे...आणि तेच जीवन गौरवने दिले आहे. मी एक साधाभोळा शिक्षक आहे.असे म्हणण्याची माझी हिंमत होणार नाही
निदान माझ्या जीवन गौरवचा ढाण्यावाघ म्हणून
तरी....या ढाण्यावाघ तुमची वाट बघतोय ...शब्दधन जीवन गौरव वाढवायला...
मी तयार झालोय तुमच्या स्वगतला आता कधीपण म्हणायला... मी पिंपरी चिंचवडमध्ये तन मन धन अर्पण करून तयार आहे. कारण
माझे पदाधिकारी मा.दीपक अमोलिक सर,
रूपाताई बेंडे, मनिषाताई भोसले,सीमाताई गांधी
व बाबू डिसोजा डिसोजा पारखून घेतलेले हिरेच
आहे...जय जीवन गौरव..!!…
-----------------------------------------------------
शब्दधन डीबी,पुणे-३३.

No comments:

Post a Comment