तुझ्या त्या आठवणीने
मन माझे झुरते रे
पिंजऱ्यात कैद मैना
पंख तीचे छाटले रे
स्वतःच्याच विरहात
मी गढून जाते रे
आस तुझ्या मिलनाची
सख्या मला लागली रे
बाई मनाच्या वेदना
कळत कशा नाही रे
जीव माझा गुंतला
सख्या तुझ्या भोवती रे
तुझ्या विना श्वास माझा
गुदमरत आहे रे
तु येणार म्हणून मी
बसली ना नटून रे
वही पेन हाती घेता
काय काय लिहू बरे
तुझ्या त्या आठवणीणे
आसवे अनावर झाले रे
वाट तुझी पाहतांना
डोळे माझे थकले रे
तु येणार परतुनी
आस मनाला आहे रे
✍ कवी
रामदास वाघमारे
No comments:
Post a Comment