Showing posts with label कवी - रामदास वाघमारे. Show all posts
Showing posts with label कवी - रामदास वाघमारे. Show all posts

Friday, 20 July 2018

खरे सांगा मला....!

*खरे सांगा मला....!*

असा कोण आहे बरे
या जगात नाही दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

एक असा दावा मला
पृथ्वी तलावर सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

किती कमविला पैसा
तरी अंतर मन दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

तुमच्या माझ्या पासून
टाटा अंबानी पर्यंत दुःखी
एक तरी आहे का हो
कुणी आजपर्यंत सुखी

ज्याचे त्याचे कर्म जैसे
तसे फळ त्याच्या मुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

संत कबिर सांगत
ज्यादा धन पायो दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

देव मानसात शोधा
मग तुम्ही आसाल सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी राहील का हो दुःखी

                              कवी
                      रामदास वाघमारे
               मो. 8888125610

Friday, 13 July 2018

मीच तुझी डिंपल

*मीच तुझी डिंपल....!*

बालपनीच्या मिञाला
मैञींन म्हणाली लाजून
असा दूर का उभा तू
का बर नाही आलास सजून

मिञ म्हणाला दुःखी होऊन
मी तर एवढा कंगाल
सांग बर कसी जुळणार
माझी अन् तुझी नाळ

तु एवढी गोरीगोरी पान
फुलासारखी छान
मी असा गावंढळ
कपडे माझे घान

मी आपला गरीब
तु किती श्रीमंत
उजेडात आली गोष्ट
तर होईल माझा अंत

मी असा वेडाभाबडा
तु दिसायला हुशार
लोक काय म्हणतील
कधी केलास का विचार

अरे तु किती वेडाभाबडा
लोकांचा करसील विचार
तर लोक तुझ्या अन् माझ्या 
खोट्या प्रेमाचा करतील प्रसार

मैञीन म्हणे मिञाला
असं काही नसतं
एकदा प्रेम झालं की,
ते कोणावरही बरसतं

खरेच सांगते मिञा
तु किती साधा अन् सिंम्पल
राम तुच माझा धीर
अन्  मीच तुझी डिंपल

                  ✍ कवी
                रामदास वाघमारे
              मो. 8888125610

Saturday, 7 July 2018

पांडूरंग

पांडूरंग

आम्ही वारकरी
निघालो पंढरी
नाचे वाटेवरी
पांडूरंग

विठ्ठू नामाचा
गातो मी अभंग
नाचूनिया दंग
पांडूरंग

वाट पंढरीची
चाले वारकरी
तुका म्हणे जरी
पांडूरंग

ध्यास लागला रे
पांडूरंगा तुझा
वारी मध्ये गातो
पांडूरंग

आस ती लागली
तुझ्या या भेटीची
माळ तुळसीची
पांडूरंग

माय रुखमीनी
बाप पांडूरंग
गावूनी अभंग
पांडूरंग

टाळ मृदूंगाचा
नाद पांढरीत
नाचतो वारीत
पांडूरंग

एकची मागणे
सुखी ठेव देवा
स्वास माझा व्हावा
पांडूरंग

जगी माझा विठ्ठू
दिसे भजनात
माळ ती गळ्यात
पांडूरंग
                       कवी
                   रामदास वाघमारे
             मो.8888125610

अभंग

अभंग

विठ्ठू माऊली तू
माऊली जगाची
माऊलीत मुर्ती विठ्ठलाची....
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

माय माझी रुखूमाई
बाप माझा पांडूरंग
तुझ्या भेटीसाठी देवा
गात निघालो अंभग
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

तुझ्या रे दर्शनासाठी
निघालो रे अनवाणी
भुकेल्यांना मिळू दे रे
पांडूरंगा अन्नपाणी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

झाडे वेली पशूपक्षी
गातात तुझी रे गाणी
जैसा भासे पांडूरंग
चाले हवा वारा पाणी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

टाळ मृदंग चिपळ्या
चाले वाजवत गाणी
पंढरीची वाट चाले
वारकरी अनवाणी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

पताका ही खांद्यावर
घेवून नाचती वारी
भेट घडू दे रे देवा
आलो आलो तुझ्या दारी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

इंद्रायनीच्या या तीरी
आलो  तुझा वारकरी
कुठे उभा विटेवरी
पांडूरंग माझा हरी
विठ्ठलाsss पांडूरंगाss....!

पांडूरंगा तुझ्या दारी
आलो घेवून ही वारी
आस लागली मनाला
भेट ना  एकदातरी
                        कवी
                 रामदास वाघमारे
               मो.8888125610

Friday, 6 July 2018

शोधू तुला कोठे कोठे

*शोधू तुला कोठे कोठे*

*जिथ तिथे रुप तुझे*
*राधेसम भासू लागले*
*याड तुझ्या नावाचे*
*या हरीला लागले....*

*तुझ्या नामाचा तो गजर*
*कुणी भजनास आले*
*याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

*राधे राधे तुझे नाम*
*हरीच्या या मुखी आले*
*याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

*मुखी गाता तुझे नाम*
*गाता डोळे ओले झाले*
*याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

  *राधे तुझ्या दारी ग*
  *हरी भक्तगण आले*
  *याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

  *उघड दार भक्तीचे हे*
  *सावळाहरी दारी आले*
  *याड तुझ्या नावाचे*
*या भक्ताला लागले*

  *नाम मुखी घेतो राधे*
  *गाण्यातून रामप्रहरी*
   *शोधू तुला कोठे कोठे*
    *भेट या हरीला एकदा तरी*

                    *✍  कवी*  
                  *रामदास वाघमारे*