Wednesday, 19 April 2023

मला अधिकारी व्हायचंय...!

*अधिकारी व्हायचे मला...!!!!*

सर्वोदय कला मंडळ औरंगाबाद

*छत्रपती प्राथमिक विद्यालय प्राथमिक विभागाचा (उन्हाळी सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम 1001 प्रश्नाचे टार्गेट, पहिली ते सातवी साठी उपयुक्त)*

चला सामान्य ज्ञान वाढवूया!!!!!
*आशीर्वाद*
स्व.कमळाबाई भिक्कन पाटील 
*संकल्पना व प्रेरणा*
मा. अध्यक्ष सुभाष पाटील साहेब
*मार्गदर्शन*
-मा. मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला व्यवहारे मँडम
*संकलन व निर्मिती*
- श्री.रामदास वाघमारे (सहशिक्षक)
*सुचना*-
दररोज पंधरा प्रश्न क्रमशः पाठवले जातील. त्याचा अभ्यास करावा व रविवारी ऑनलाईन चाचणी सोडवावी.
*अधिकारी व्हायचे मला!!*
*नाविन्यपूर्ण उपक्रम*
चला सामान्यज्ञान वाढवूया.......
दिनांक- 20/04/2023 वार-गुरूवार
१ला दिवस   क्रमशः...
१)प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
उत्तर -भंडारदरा
२) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते?
उत्तर -पंडू राजा
३) राधानगरी हे प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या शहरात आढळते?
उत्तर -कोल्हापूर
४) बाल शिवाजीने वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला?
उत्तर -सोळाव्या वर्षी
५) महाराष्ट्रात पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले?
उत्तर -गोदावरी
६) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरणाचे नाव काय?
उत्तर -गंगापूर धरण
७) महाभारतातील कौरवांच्या वडिलांचे नाव काय?
उत्तर -धृतराष्ट्र
८) भारताच्या कोणत्या भागात महाराष्ट्र राज्य आहे?
उत्तर -पश्चिम
९) महाडच्या गणपतीचे नाव काय?
उत्तर -वरदविनायक
१०) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर -सुमारे तीन लाख चौरस किलोमीटर.
११) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते?
उत्तर -चंद्रभागा
१२) महाराष्ट्रात "श्रीमंत मंदिर "कोणास म्हटले आहे?
उत्तर -शिर्डी साईबाबा मंदिर
१३) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?
उत्तर -तिसरा
१४) महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहेत?
उत्तर -मध्य प्रदेश
१५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता?
उत्तर -भंडारा
*संकलन व निर्मिती*
रामदास वाघमारे सर
सदर प्रश्नावली ब्लॉगवर उपलब्ध

*सहकार्य सर्व शिक्षक वृंद*
छत्रपती प्राथमिक विद्यालय गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर 

No comments:

Post a Comment