Friday, 21 April 2023

होय मला अधिकारी व्हायचंय...!

*मला अधिकारी व्हायचंय...!!!!*

सर्वोदय कला मंडळ औरंगाबाद संचलित 

 *छत्रपती प्राथमिक विद्यालय प्राथमिक विभागाचा (उन्हाळी सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम 1001 प्रश्नाचे टार्गेट, पहिली ते सातवी साठी उपयुक्त)*

चला सामान्य ज्ञान वाढवूया!!!!!

*आशीर्वाद* 
स्व.मोतोश्री.कमळाबाई भिक्कन पाटील  
*संकल्पना व प्रेरणा*
मा. अध्यक्ष सुभाष पाटील साहेब
*मार्गदर्शन*
-मा. मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला व्यवहारे मँडम
*संकलन व निर्मिती*
- श्री.रामदास वाघमारे (सहशिक्षक)
*सुचना*-
दररोज पंधरा प्रश्न क्रमशः पाठवले जातील. त्याचा अभ्यास करावा व रविवारी ऑनलाईन चाचणी सोडवावी. 
*अधिकारी व्हायचे मला!!*
*नाविन्यपूर्ण उपक्रम*

चला सामान्यज्ञान वाढवूया....... 
दिनांक- 22/04/2023 वार-  शनिवार 

*3 रा  दिवस   ...भाग 3 क्रमशः-*

३१)महाराष्ट्रात पांडवलेणी कोणत्या शहरात आढळतात? उत्तर -नाशिक
३२) वेरूळ- अजंठा मध्ये कोणती लेणी प्रसिद्ध आहेत?
उत्तर -बौद्ध लेणी
३३) नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
उत्तर -गोदावरी
३४) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर -कळसुबाई
३५) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- पुणे
३६) महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कोणते?
उत्तर -लावणी
३७) महाराष्ट्रात साजरा करण्यात येणारा प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव कोणता?
उत्तर -गणपती उत्सव
३८) महाराष्ट्रात पैठणी कुठे तयार केली जाते?
उत्तर -येवला
३९) जळगाव हे कुठल्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर -केळी
४०) महाराष्ट्रात काजू साठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर -मालवण
४१) स्ट्रॉबेरी साठी कुठले शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर -महाबळेश्वर
४२) महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता?
उत्तर -कबड्डी
४३) महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते?
उत्तर -पुणे
४४) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे?
उत्तर -मुंबई
४५) महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर -१ मे

*संकलन व निर्मिती*
श्री.रामदास वाघमारे सर
सदर प्रश्नावली ब्लॉगवर उपलब्ध
http://jeevangaurav.blogspot.com/2023/04/blog-post.html

*सहकार्य सर्व शिक्षक वृंद* 
छत्रपती प्राथमिक विद्यालय गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर

No comments:

Post a Comment