*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )-- बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक , सामाजिक मासिकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २८ सप्टेंबर २०१८ पर्यत पाठवायचे आहे
राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक , सामाजिक, कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक ,सामाजिक मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक : २८ सप्टेंबर २०१८ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक श्रीमती राजश्री पल्लेवाड मो.नं. ९४०३०४४००५ ,
कार्यकारी संपादक तथा मुख्याध्यापक संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 , यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे,श्रीमती कल्पना फुसे, डाँ.रत्ना चौधरी, श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे, डि.बी .शिंदे ऊर्फ शब्दधन, बाळासाहेब निकाळजे, प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस, विजय पाताडे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
*नियम व अटी*
१) पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात मुख्याध्यापकांचे हमी पञ नसल्यास प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१९ असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा वार्षिक सभासद असेल तर ३ गुण , द्विवार्षीक सभासद असेल तर ५ गुण आणि अजीवन सभासद असल्यास १० गुण दिले जातील.
*टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता, प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री - वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन - *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
शरद ठाकर - *परभणी*
प्रविण डाकरे- *सांगली*
महादेव हवालदार - *सांगली*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
महादेव खळुरे - *लातूर*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
सुनिल मोरे - *धुळे*
उमेश खोसे - *उस्मानाबाद*
गणेश सुलताने - *जालना*
मु.अ. अनिता कांबळे - *रायगड*
*असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*
ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव
नाशिक येथील संपादक यांचे नाव व मोबा नंबर कळवा
ReplyDelete