Saturday, 6 May 2017

भास

      *भास*

जीवन गौरवच्या वाटेवरती
सखे मला भेटलीस
हरवलेल्या मनाला
समज तूच घातलीस.....

कोमेजलेल्या कळीला
साद तूच घातलीस
सुकलेल्या वेलीला
वाचा तुच तर फोडलीस....

वाहणाऱ्या आसवांना
आवर तुच तर घातलीस
मरून पडलेल्या देहाला
संजीवनीची फुंकर तुच तर मारलीस......

सुखात आणि दुःखत
साथ तुच तर दिलीस
गोठलेल्या भावनांना
वाचा तूच तर फोडलीस....

सरते शेवटी का होईना
साथ नाहीस सोडलीस
मुक्या भावनांना ख-याआर्थानं
वाचा तूच तर फोडलीस.....

शेवटी गोड तुझ्या आवाजाने
दिस माझा गोड जातोय
खारचं सांगतोय सखे तुला
तुझ्या मधूर बोलण्याचा भास मला होतोय......

                       रामदास वाघमारे
                मो.नं.8888125610

No comments:

Post a Comment