*वाट पाहणारं प्रेमाचं दार*
प्रतेकाच्या जीवनात
कुणीना कुणी आसतं
खरच सांगतो त्या प्रेमाला
प्रेमं हे वाट पाहणार आसतं....
वाट पाहणाऱ्या प्रेमाचं
एक वेगळचं गाव असतं
गावातल्या प्रतेक घराला
एक मनाचं दार आसतं.....
मनाच्या उंबरठ्याआड
रोज प्रेम वाट पाहत आसतं
त्या प्रेमाला ना कधी
दुनियादारिचं भान असतं......
या दुनियादारीच्या चुघलीने
प्रेम रुसतं फुगतं रडत असतं
गैरसमजाच्या वाळविणं
प्रेम दूर दूर पळत असतं......
दूर दूर पळणा-या प्रेमासाठी
प्रेम अस्वस्थ होत असतं
आणि अश्रूच्या धारा सोबत
प्रेम व्यसनाधिन होत असतं.....
व्यासनाधिन आडकलेल्या
प्रेमाला प्रेमानीच सावरायचं असतं
अडखळणा-या पावलांना
प्रेमानीच सावरायचं असतं.......
सावरणा-या प्रेमानी फक्त
एकच काम करायचं आसतं
उभ्या आयुष्यात प्रेमाला
जीवापाड जपायचं असतं
जीवापाड जपताजपता
प्रेमाचं मन तोडायचं नसतं
तळ हाताच्या फोडा प्रमाणं
प्रेमाला जपायचं असतं......
खरच सांगतो मिञ हो
वाट पाहणारं आपलं
एक वेडं प्रेमं असतं
प्रतेकाच्या ह्दयात
कोरलेलं एक प्रेमाचं दार असतं.....
✍ रामदास वाघमारे
मो.नं. 8888125610
No comments:
Post a Comment