*मन अधीर झाले*
हळव्या माझ्या मनाला
सखे मी आताच सावरले
तुझ्या दुरजाण्याच्या आठवणीने
आज माझे मन गहिवरले....
काहीना काही सखे
असतो बघ तुझा बहाणा
रोज तुझी वाट पाहणारा
सखे मी आहे ग तुझा दिवाना....
फोनवर बोलण्यात सखे
आजीबात तुला वेळच नाही
उगाच काही तरी बहाना शोधून
म्हणे आज माझा मुडच नाही.....
तुझी वाट पाहता पाहता
सखे कैक दिवस निघून गेले
तप्त ऊन्हात गुलमोहराचे फुल
वाट तुझी पाहता सुकून गेले.....
आता नको ग तु दूर जावू
तनमन माझे बधीर झाले
ओढ लागली मिलनाची
तुला भेटण्यास मन अधीर झाले....
✍ रामदास वाघमारे
मो.नं.8888125610
No comments:
Post a Comment