*फक्त तुझाच विचार*
सखे भावणेच्या भरामधी
खरेच मला काहीच नाही कळालं
माझ्या प्रत्येक शब्दातून आनंद नाही
तर तुला दुःखच सारं मिळालं....
सखे भावणेच्या भरामधी
तुला खुप काही बोललो
कालांतराने तुझ्या जागी येवून
विचार केला तर मीच माझा हरलो..
सतत सतत तुझ्या या आठवणीने
घर,दार,शाळा,अंगण येथा दिसतेत
जवळच माझ्या असून देखील
सखे तू मला दूर दूर कशी भासतेस...
सखे तुझी आठवण आली की
नुसता पोटात उठतो गोळा
रोज अंथरूणावर पडलो की
शपथ माझा लागत नाही ग डोळा....
उठून लेखनी हातात घेतली की
सखे चेहरा तुझाच दिसतोय
भरभरून कविता लिहिली की
राञभर तुझाच विचार घोळतोय...
कवि
रामदास वाघमारे
मो.नं. 8888125610
No comments:
Post a Comment