Saturday, 6 May 2017

सखे तुला शोधू तरी कुठे

      *शोधू तरी कुठे*

माझ्या कवितेची कवणे
सखे गाऊ तरी कुठे
वर्णावया तुझी महती
मी मांडू तरी कुठे....

भाषा तुझी साधी सुधी
या पृथ्वी तलावावर ऐकू तरी कुठे
मधूर तुझे ते बोलणे वागणे
सखे मी बसून ऐकू तरी कुठे....

तुझा रसिक मी सच्या
तुझे गाणे ऐकू तरी कुठे
कान माझे टवकारलेले
सखे तुझे बोल ऐकू तरी कुठे...

तुझा तो चेहरा पाहण्यासाठी
रोज तुला मी शोधू तरी कुठे कुठे
चंद्र ,तारे,सुर्य,शोधून झाले
तरी सखे तु दिसेना झालीस कोठे .....

कुणाची नजर लागली की काय
आच्यानक गायब झालीस तरी कुठे
रामदासाच्या प्रेमळ लेखनीने
सखे तुला शोधू तरी कुठे कुठे.....

                                   कवि
                       रामदास वाघमारे
                मो.नं.8888125610

No comments:

Post a Comment