Saturday, 6 May 2017

प्रश्न ...?

प्रश्न  ....?

सखे एक प्रश्न विचारु....⁉
आयुष्य आपले किती दिवसाचे आहे
आनंद प्रतेकाने घ्यावा
उगाच का नशिबाला आपल्या
उठ सुठ दोष द्यावा.......⁉

सखे एक प्रश्न विचारु.......⁉
हातावर माझ्या
तुझा हात पाहीजे
जीवात जीव असे पर्यत
सखे तुझी साथ पाहिजे.....⁉.

सखे एक प्रश्न विचारु.......⁉
तुझ्या या विरहाने
पापण्या भिजतात अनेकदा
डोळ्यातील पाण्याला
विचार जरा एकदा.....⁉

सखे एक प्रश्न विचारु......⁉
सखे बघ माझ्या डोळ्यांत
तुझेच ते प्रतिबिंब दिसेल
तुझ्या शिवाय माझ्या डोळ्यात
कोण बरे असेल......⁉

सखे एक प्रश्न विचारु......⁉
तळहाताच्या फोडा पेक्षाही
जपले आहे मी  तुला,
कदाचित् चूकले असेल माझे
तर मोठ्या मनाने माफ केले
पाहीजे की नाही तु मला...⁉

सखे एक प्रश्न विचारु......⁉
छान बोलावे छान लिहावे
असे मनोमन वाटते ग
पण गैरसमज अँड येतो
म्हणून तर वाईट वाटते ग..⁉
सखे एक प्रश्न विचारु........⁉
स्वप्नात होतो मी
स्वप्नात जाग आली
काय सांगू सखे तुला
तुझीच आठवण आली....⁉
सखे एक प्रश्न विचारु......⁉
शेवट होण्यासाठी
थोडीच चारोळी लिहली
तुला उदंड आयुष्य लाभावे
म्हणून तर माझी लेखनी वाहीली....⁉

सखे एक प्रश्न विचारु........⁉
आज आठवणीत तुझ्या
आसवांची साथ होती
सखे तुझी चारोळी वाचतांना
आज आसवे वाहत होती....⁉
         
सखे एक प्रश्न विचारु........⁉
तुझ्या त्या गैरसमजाने
पुरता मी खचून गेलो
माझ्याच नजरेत मी
पार मरुन गेलो.......⁉

सखे एक प्रश्न विचारु........⁉  
मैञीत तुझ्या आणि माझ्या
कधी दुरावा न येवो
अशीच आपली जोडी
सदैव हसत राहो......⁉

सखे एक प्रश्न विचारु.........⁉
सिता विना आधूरा
राम आज आहे
माधूरी माझी कुठे गेली
तीला मी शोधत आहे......⁉
                       ✍ रामदास
( अपुर्ण आहे ..उरर्वरीत पुढील कवितेत वाचा..)

No comments:

Post a Comment