Saturday, 6 May 2017

राम तुझा दास गं....!

  *राम तुझा दास गं*

राहत असलीस जरी तू दूर गं
तू जवळच असल्याचा होतो भास गं
सखे तुझ्या चरणी माझी
भक्ती झाली आज लीन गं......

अजिंठा लेणीतील तु अपसरा गं
त्या मुर्ती समान माझी भक्ती गं
सखे तुझ्या  मुर्तीला मी
आज कमळ पुष्प अर्पिले गं....

वाट पाहतो देवा समान गं
एकदा या भक्ताला पाव गं
किती पाहसील अंत गं
नको खाऊस भाव गं.......

प्रेम माझे खरे गं
ध्यास फक्त तुझाच गं
सखे तुझ्या चरणाचा
राम तुझा दास गं.......

                               कवि
                     रामदास वाघमारे
                मो.नं.8888125610

No comments:

Post a Comment