Showing posts with label संपादक :-रामदास वाघमारे. Show all posts
Showing posts with label संपादक :-रामदास वाघमारे. Show all posts

Wednesday, 8 May 2019

नोंदणी केलेल्या सभासदांची यादी

http://jeevangaurav.blogspot.com/2019/04/blog-post.html

http://jeevangaurav.blogspot.com/2019/02/blog-post_21.html

👆 वरील इंग्रजी अक्षरावरती स्पर्श करा

*दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन नासिक*

*नोंदणी केलेल्या सभासदांची यादी*

१) श्रीमती वैशाली विनोद ढोबळे - वर्धा
२) श्रीमती नंदिनी पंडितराव वाघ -जळगाव
३) श्रीमती दिपा दिनेश वाडेकर - नंदूरबार
४) कु. तनुष्का दिनेश वाडेकर,(बाल कवियत्री)-,नंदुरबार
५) विनोद सावंत - सोलापूर
६) शाम चौकडे - अमरावती
७) खुशाल गुल्हाणे - अमरावती
८) उषा ढेरे - बीड
९) राजू लहिरे - मनमाड नासिक
१०) धनश्री गजमल गांगुर्डे  - नासिक
११) अनिलकुमार लक्ष्मण बहीरम - नासिक
१२) शोभा दळवी - बीड
१३) प्रशांत सुर्यवंशी - पुणे
१४) आशा चिने - शिन्नर नासिक
१५) सारिका पारखी - नासिक
१६) प्रणिता कुलकर्णी - पुणे
१७) प्रतिभा बोबे - अहमदनगर
१८) अंगद शेंडगे - नंदूरबार
१९) सतिश कराड - बीड
२०) उमा चव्हाण -नासिक
२१) करणसिंग तड़वी - नंदुरबार
२२) प्रशांत ढोले - वर्धा
२३) प्रा. अरविंद पाटील - वर्धा
२४) प्रकाश बन्सोड - वर्धा
२५) बाळकृष्ण राठोड - मुंबई
२६) सविता चव्हाण - नासिक
२७) अनिल साबळे - ठाणे
२८) सुरेश लांजेवार -भंडारा
२९) संपत गर्जे - पुणे
30) शुभांगी फुलेलवाड - औरंगाबाद
३१) मनिषा ठाकूर - मालेगाव नासिक
३२) संदीप कांबळे-  कोल्हापूर
३३) वैशाली जाधव - नाशिक
३४) अजय काळे - सांगली
३५) श्री संतोष गोपा दातीर - रायगड
३६ ) कु .ऋतुजा संतोष दातीर - रायगड
३७) छाया पाटील - नाशिक
३८) खुशाल डोंगरवार - भंडारा
३९) स्वामी जाधव - औरंगाबाद
४०) अभिजीत सोनवणे - औरंगाबाद
४१) प्रा. डॉ. किरण प्रभाकर वाघमारे-  वाशिम
४२) जया कुलथे - अहमदनगर
४३) चि.आयुष राठोड ( बालकवी)- मुंबई
४४) देविदास बुधवंत - अहमदनगर
४५)  प्रियंका पाटील - नंदूरबार
४६) शीतल सुनील बडगुजर -जळगाव
४७)प्रदिप देवरे -चांदवड -नाशिक
४८) प्रदिप देवरे -२ - नाशिक
४९) सारिका बोबे - उस्मानाबाद
५०) पुजा केदार - नाशिक
५१) संदिपृ भायदे - रायगड
५२) शोभा कदम - बीड
५३) नागोराव तिप्पलवाड -.नांदेड
५४) कल्पना गोवेकर मालेगाव -नाशिक
५५) अरुण इंगळे हातनोरे नाशिक 
५६) सौ.नंदिनी  हवालदार  -  सांगली
५७) प्रदिप महाले - दिंडोरी नाशिक
५८) कु . हर्षवर्धन पाखरे (बाल कवी) - रायगड - कर्जत
५९) श्री मारूती  बागडे -  रायगड - कर्जत
६०) स्वाती अहिरे - अहमदनगर
६१) कविता बिरारी - नाशिक
६२) चि.दुर्गेश पन्नालाल राठोड - (बालकवी) -ठाणे
६३) प्रशांत शेळके - पुणे
६४) सविता बोरसे - नाशिक
६५) समीर देवडे - नाशिक
६६) मनिषा कुलकर्णी  - मालेगाव नाशिक
६७) किशोर चलाख - सांगली
६८) किरण ठाणांबीर - उस्मानाबाद
६९) प्रकाश डुबे - परभणी
७०) किरण गुंबाडे - नाशिक 
७१) विकास पाटील - सांगली
७२) संध्याराजनी  सावकार - नाशिक
७३) दादासाहेब पगार - नाशिक
७४) सुनिल पावले - अहमदनगर
७५) लोकेश पाटील - नाशिक
७६) प्रार्थना देशपांडे - नांदेड
७७) कांचन घुगे- नाशिक
७८) वासंती पाठक - नाशिक
७९) प्रतीक्षा पाटील - नाशिक
८०) करूणा गायकवाड - नाशिक
८१) छाया देवरे - नाशिक
८२) स्वाती शिंदे - उस्मानाबाद
८३) एम. नौशाद अब्बास - नाशिक
८४) समाधान इच्चे - औरंगाबाद 
८५) सुरेखा सुर्यवंशी - नाशिक
८६)  प्रशांत पगार - नाशिक
८७) वैशाली सुर्यवंशी - नाशिक
८८) शांताराम वाघ मनमाड नाशिक

------------------------------------------

*दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन नासिक*

*दिनांक २१ मार्च नंतर नोंदणी केलेल्या सभासदांची यादी*

१) अनुराधा तारगे - नाशिक
२) संगिता ढोमसे -नाशिक
३) निलेश सोनवणे - औरंगाबाद -
४) रेखा सुर्यवंशी - नाशिक
५) वंदना सलवदे - सोलापूर
६) चंद्रकांत फाळके - नाशिक
७) योगेश वाघ - नाशिक
८) मनीषा पाटील - नाशिक
९) अर्चना खोब्रागडे - यवतमाळ -
१०) सोनाली भागवत- नाशिक
११) सुरेश हिवाळे - सेलू परभणी
१२) डिंगबर रोकडे - सेलू परभणी
१३) ज्योती अवघडे - रायगड 
१४) राहुल आंधळे -बीड
१५) अरुणा सरमोकादम - रत्नागिरी
१६) साधना ब्राम्हणकार  - नाशिक
१७) प्राचार्य शरद  गीते - नाशिक
१८) पदमाकर मांडवधरे -अमरावती
१९) विलास जमधाडे - नाशिक
२०) चिं खुशाल चव्हाण -वाशीम
२१) श्रध्दा मोहीते - रत्नागिरी
२२)  छाया राडे - वर्धा
२३) लता सूर्यवंशी - नाशिक
२४) नूतन चौधरी -  नाशिक
२५) शोभा बच्छाव - नाशिक

Wednesday, 28 November 2018

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

राज्यातील ४७ शिक्षकांना बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी l औरंगाबाद , बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे राज्यातील ४७ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार    देवून गौरविले जाणार आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा १३ जानेवारीला औरंगाबाद येथील तापडीया नाट्यगृह निराला बाजार येथे पार पडणार आहे. अशी माहीती बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष , सचिव , उपध्यक्ष, कोषाध्यक्ष,इतर सदस्य यांनी दिली. या निवडीचे स्वागत रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, मु.अ. संदिप सोनवणे, मीरा वाघमारे यांनी पुरस्कार्थांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.
      सदरील पुरस्कारासाठी या ४७ शिक्षकांची निवड समितीने नावे नुकतीच  जाहीर केली आहे. सदर पूरस्कारासाठी या सर्व शिक्षकांचे शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून निवड  करण्यात आली आहे.
       या पुरस्कार विजेत्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १) औरंगाबाद शहरातील शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयातील सहशिक्षक शंकर दादाराव भडगे  तसेच २) औरंगाबाद शहरातील शिवशंकर काॕलनीतील संस्कार प्रबोधिनी शाळेतील सहशिक्षक सुनिल अभिमन निकम , ३) हर्सूल येथील न्यू हायस्कूलचे शिक्षक अमोल भुजंगराव देवडे , ४) पळशी ता.जि.औरंगाबाद येथील जि.प.प्रा. शाळेतील शिक्षिका स्वाती भगवान गवई यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ५) बीड जिल्ह्यातील व तालुक्यातील जरुड केंद्राअंतर्गत ढेकणमोहा जि.प.प्रा. शाळेतील शिक्षिका उषा बप्पासाहेब ढेरे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
     ६) उस्मानाबाद जिल्ह्यातील चार शिक्षकांना 'राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार  दिला जाईल. यामध्ये कळंब तालुक्यातील शेलगाव जि.प. प्रा. शाळेचे सहशिक्षक हनमंत सोपान पडवळ, ७) परंडा तालुक्यातील शिंदेवस्ती जि.प.प्रा.शाळेचे सहशिक्षक सुखदेव विष्णू भालेकर , ८) भूम शहरातील रविंद्र हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती किरण बाजीराव ठाणांबीर , ९) उस्मानाबाद तालुक्यातील किणी जि.प. शाळेतील श्रीमती संगीता उत्तमराव थडवे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
      १०) परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव जि.प. शाळेचे शिक्षक गणेश शाहुराज तोडकर , ११) तसेच याच तालुक्यातील चुकारपिंपरी येथील जि.प. शाळेतील शिक्षक प्रमोद बब्रूवान जाधव यांना सदरील ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे .
      १२) लातूर जिल्ह्यातील चार शिक्षकांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाईल. त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील कुमठा ब्रु. येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक दिपक धोंडीराम हालकंचे , १३) रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील जि.प.प्रा. शाळेच्या सहशिक्षिका सत्यशीला महालिंगप्पा कलशेट्टी , १४) देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा येथील जि.प. प्रा. शाळेचे सहशिक्षक सुशीलकुमार मुरलीधर पांचाळ, १५) लातूर तालुक्यातील जेवळी जि.प.प्रा. शाळेतील सहशिक्षिका श्रीमती छाया गोविंदराव देशपांडे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      १६) अहमदनगर जिल्ह्यातून अकोले शहरातील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सय्यद दिलशाद यासीन , १७)  व  नगर शहरातील निर्मलनगर रोडवरील श्री नाथ विद्यामंदीराचे देविदास शिवाजी बुधवंत यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      १८) पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील जि.प. मराठी शाळेच्या  शिक्षिका श्रीमती मनिषा रामचंद्र मुळूक यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
       सातारा जिल्ह्यातून चार शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दिला जाईल.  १९) त्यात फलटण तालुक्यातील कारंडेवस्ती ( भलवडी) जि.प.शाळेतील  गणेश भगवान तांबे , २०)  जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी जि.प. शाळेच्या श्रीमती अंजली शशीकांत गोडसे ,   २१) खटाव तालुक्यातील भुरकवाडी जि.प. शाळेच्या श्रीमती रुपाली मधुकर सुतार , २२) माण तालुक्यातील हिंगणे जि.प. शाळेचे विजयकुमार रामचंद्र काळे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     २३)  सांगली जिल्ह्यातून मिरज तालुक्यातील मळाआरग जि.प. शाळेतील सहशिक्षक पोपट शिवाजी निकम , २४) कवढे महांकाळ तालुक्यातील खारसिंग जि.प. शाळेतील तारीश आब्बास अत्तार , २५) तासगाव तालुक्यातील दहिवडी जि.प. शाळेचे सहशिक्षक अजय महादेव काळे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
       २६) नाशिक जिल्ह्यातून येवला तालुक्यातील चिंचोडी खुर्द येथील जि.प. शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती संगीता शिवाजी  शिंदे , २७) इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे जि.प. शाळेतील सहशिक्षक अतुल अशोकराव अहिरे , २८)  येवला तालुक्यातील धामणगाव जि.प. शाळेचे सहशिक्षक ज्ञानदेव सहादू नवसरे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
       २९)  जळगाव जिल्ह्यातून अंमळनेर तालुक्यातील निंभोरा माध्यमिक विद्यालयाचे नारायण रमण चौधरी  ३० ) व जामनेर तालुक्यातील ढालगाव जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक संदिप जगन्नाथ पाटील यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
       ३१) पालघर जिल्ह्यातून डहाणू तालुक्यातील खानीव जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक संतोष भगावान तळेकर  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
        ३२) ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील शिक्षणशास्ञ महाविद्यालयातील प्रा.भगवान हरी विशे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले  जाणार आहे.
      ३३) रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील दहिगाव जि.प.शाळेतील सहशिक्षक संतोष गोपा दातीर , ३४) पेण तालुक्यातील गौळणवाडी जि.प. शाळेच्या सहशिक्षिका ज्योती दिपक अवघडे , ३५) श्रीवर्धन तालुक्यातील भरडगोल जि.प. शाळेचे सहशिक्षक संदिप नथुराम भायदे  यांना  ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाणार आहे.
      ३६) घाटकोपर मुंबई येथील भटवाडी येथील स्वामी रामानंद हायस्कूलच्या सहशिक्षिका श्रीमती अनिता मिलिंद चव्हाण यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      ३७) रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातील नाणीजगुरव शिवगणवाडी जि.प.प्रा. शाळेतील  सहशिक्षिका श्रीमती श्रध्दा सुहास मोहिते यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      ३८) सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली तालुक्यातील जि.प. शाळा क्रमांक ३ मधील सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ३९) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंकगले तालुक्यातील इंचलकरंजी हायस्कूल येथील सहशिक्षक उत्तम आनंदा हवालदार  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ४०) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंबाड येथील यशवंत प्रायमरी स्कूलचे सहशिक्षक सोमनाथ राजाराम होनमोटे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
   ४१) अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदळी खुर्द येथील देशभक्त कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.भास्कर सदाशिव काळे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      ४२) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब जि.प.शाळेतील शिक्षिका श्रीमती संगीता रविंद्र तट्टे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाईल.
      ४३) चंद्रपूर जिल्ह्यातून गोंडपिंपरी तालुक्यातील गंगाराम तळोदी येथील जि.प.शाळेतील सहशिक्षक दुशांत बाबूराव निमकर यांना  ४४) व गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी केंडातील मोहोळी जि.प. प्रा. शाळेतील सहशिक्षक मारोती बिराजी आरेवार  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
    ४५) वर्धा जिल्ह्यातून वर्धा शहरातील केसरीमल कन्या हायस्कूलमधील श्रीमती मनिषा विनायक साळवे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ४६) नंदूरबार जिल्ह्यातील बामडोद जि.प. शाळेतील सहशिक्षक आनंदराव संपतराव करनकाळ यांना हा पुरस्कार दिला जाईल.
     ४७) धुळे जिल्ह्यातून साक्री तालुक्यातील पिंपळगाव येथील सायजाबाई आदिवासी माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक विजय पांडुरंग सुर्यवंशी  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

Wednesday, 24 October 2018

जीवन गौरव विशेषांकासाठी लेख पाठवा.

*®जीवन गौरव l शैक्षणिक मासिक ®*
वर्षे ३ रे -  अंक अकरावा + बारावा  (विशेषांक)
------------------------------------------
*✍ मिञ हो नमस्कार .....*
आपले साहित्य ,लेख  *माहे डिसेंबर - जानेवारी - विशेषांक -२०१९* या  महिन्यातील जीवन गौरवच्या *विशेषांकासाठी*  खालील विषयावर आपले लेख  *दिनांक : १ डिसेंबर- २०१८ पर्यत  पाठवावेत....🙏*

*मेल..jeevangaurav76@gmail.com*
                                       
-----------------  
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय गुरुमाऊली , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, ,जीवन गौरव सभासद ,सर्व सन्माननिय वाचक  मिञ हो......!
     *महाराष्ट्रातील गुरुमाउलिंचे नामांकित शैक्षणिक मासिक जीवन गौरव साठी आपले लेख या मेलवर पाठवा..👉 मेल..    jeevangaurav76@gmail.com  पाठवा*    

*विषय :-*✍📖

*🔰 १) रयतेचा जानता राजा छञपती शिवाजी महाराजांची युध्द निती.*

*🔰 २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार*

*🔰 ३) शेतकऱ्याचे कैवारी महात्मा जोतीराव फुले*

*🔰 ४) स्ञीशक्तीची शक्ती : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले*

*🔰 ५ ) थोर समाज सेवक गाडगे महाराज*

*🔰 ६ ) जीवन गौरव -  एक शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक चळवळ*

*🔰 ७ ) जीवन गौरव आणि तंत्रज्ञान*
                     
*🔰 ८ ) जीवन गौरवची गरुडझेप*

*🔰 ९ ) एका प्रसिध्द साहित्यिकाचा/कवीचा परिचय*

*🔰 १० ) माझ्या वाचणात आलेले एक सुदंर पुस्तक परिचय*

*🔰 ११ ) जीवन गौरव मासिक शिक्षक विद्यार्थ्यांनसाठी वरदान*

*🔰 १२ ) जनसेवा हीच, खरी ईश्वरसेवा*
(या सदराखाली एका समाजसेवकाचे मनोगत/अनुभव)

*🔰 १३ ) जीवन गौरवने आम्हाला काय दिले*

*🔰 १४ ) वाचकांच्या प्रतिक्रिया !*

*📚 लेख / कविता  PDF फाईल मध्ये किंवा फोटो झेराँक्स करुन मेल वरतीच पाठवावे कृपया Whatsup वरती पाठवू नये*
     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काही आडचण उदभवल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*

*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपल्या  स्वतः चे  संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत. तसेच न विसरता आपला पासपोर्ट फोटो मेलवरती पाठवावा*
   
*🔹🔹 ✍ संपादक*
  जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ ,गल्ली नं.६ , आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
मो.नं.8888125610
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*

जीवन गौरव विशेषांकासाठी लेख पाठवा

*®जीवन गौरव l शैक्षणिक मासिक ®*
वर्षे ३ रे -  अंक अकरावा + बारावा  (विशेषांक)
------------------------------------------
*✍ मिञ हो नमस्कार .....*
आपले साहित्य ,लेख  *माहे डिसेंबर - जानेवारी - विशेषांक -२०१९* या  महिन्यातील जीवन गौरवच्या *विशेषांकासाठी*  खालील विषयावर आपले लेख  *दिनांक : १ डिसेंबर- २०१८ पर्यत  पाठवावेत....🙏*

*मेल..jeevangaurav76@gmail.com*
                                       
-----------------  
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय गुरुमाऊली , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, ,जीवन गौरव सभासद ,सर्व सन्माननिय वाचक  मिञ हो......!
     *महाराष्ट्रातील गुरुमाउलिंचे नामांकित शैक्षणिक मासिक जीवन गौरव साठी आपले लेख या मेलवर पाठवा..👉 मेल..    jeevangaurav76@gmail.com  पाठवा*    

*विषय :-*✍📖

*🔰 १) रयतेचा जानता राजा छञपती शिवाजी महाराजांची युध्द निती.*

*🔰 २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार*

*🔰 ३) शेतकऱ्याचे कैवारी महात्मा जोतीराव फुले*

*🔰 ४) स्ञीशक्तीची शक्ती :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले*

*🔰 ५ ) थोर समाज सेवक संत गाडगे महाराज*

*🔰 ६ ) जीवन गौरव -  एक शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक चळवळ*

*🔰 ७ ) जीवन गौरव आणि तंत्रज्ञान*
                     
*🔰 ८ ) जीवन गौरवची गरुडझेप*

*🔰 ९ ) एका प्रसिध्द साहित्यिकाचा/कवीचा परिचय*

*🔰 १० ) माझ्या वाचणात आलेले एक सुदंर पुस्तक परिचय*

*🔰 ११ ) जीवन गौरव मासिक शिक्षक विद्यार्थ्यांनसाठी वरदान*

*🔰 १२ ) जनसेवा हीच, खरी ईश्वरसेवा*
(या सदराखाली एका समाजसेवकाचे मनोगत/अनुभव)

*🔰 १३ ) जीवन गौरवने आम्हाला काय दिले*

*🔰 १४ ) वाचकांच्या प्रतिक्रिया !*

*📚 लेख / कविता  PDF फाईल मध्ये किंवा फोटो झेराँक्स करुन मेल वरतीच पाठवावे कृपया Whatsup वरती पाठवू नये*
     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काही आडचण उदभवल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*

*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला स्वतः चे  संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत. तसेच न विसरता आपला पासपोर्ट फोटो मेलवरती पाठवावा*
   
*🔹🔹 ✍ संपादक*
  जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ ,गल्ली नं.६ , आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
मो.नं.8888125610
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*

Sunday, 12 August 2018

माझा परिचय

           *माझा परिचय*

*संपूर्ण नाव :-*  रामदास रखमाजी वाघमारे
*जन्म तारीख  :-*  ११ एप्रिल १९७६
*शैक्षणिक पाञता :-* एच .एस.सी./ डी.एड./ बी.ए./ एम.ए./ सीटीसी./  बी.जे.(पञकारीता कोर्सला प्रवैश.)
*व्यवसाय :-*  प्राथमिक शिक्षक
*शाळेचा पत्ता :-* छञपती प्राथमिक विद्यालय , गारखेडा परिसर , औरंगाबाद .
पञव्यवहाराचा पत्ता :- जीवन गौरव कार्यालय,  प्लाॕट नं. २७  ,  गल्ली नंबर ६ , आनंद नगर ,गारखेडा परिसर औरंगाबाद .
*मोबाईल नंबर :-* ८८८८१२५६१० , ९४०३७५१८०६
  *मुख्य संपादक तथा मालक* :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य
*अध्यक्ष :-*  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद .
*अध्यक्ष  :-*  जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद .
*सचिव :-*  मुप्टा शिक्षक संघटना (प्राथमिक विभाग )
*प्रकाशित साहित्य* :- १)  कलेतील दिपस्तंभ - पहिले पुस्तक - २००३ मध्ये प्रकाशित
२) माय माझी - दुसरे पुस्तक कविता संग्रह - २००७
३)  बुध्दवचना - धार्मिक ग्रंथ - २०१३
४) डाँ.बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य - बालसाहित्य - २०१४
५) मातारमाई जीवन व कार्य - बालसाहित्य - २०१४
६)  भगवान गौतम बुध्द - जीवन व कार्य -२०१४
*बालसाहित्य :-* बालनगरी  बालकाव्य संग्रह , डोंबारीवाला  काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर
*लेखन*:-
विविध मासिकातून दैनिकातून लेखन , सामाजिक दाईत्व निभावणा-या तसेच प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती घेवून जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी दिलेल्या आहेत. 
*शैक्षणिक कार्य:-* विद्यार्थ्यांना शैक्षणिक  क्रियेचा केंद्रबिंदू मानून निदानात्मक मुल्यमापनाला महत्त्व देवून विद्यार्थ्यांकडून ज्ञानरचनावादातून कृती युक्त शिक्षण देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून मोलाचे काम.
*सामाजिक कार्य :-* समाजाचे आपले देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवून समाजप्रोबधन पर व्याख्याने, सामाजिक दाइत्व मोफत आन्नदान, गरजू व होतकरु  विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप,दर वर्षी वृक्ष रोपन कार्यक्रम ,
*शिक्षकांनसाठी दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन*
तसेच
*राज्यस्तरीय पुरस्कार वाटप*:-   महाराष्ट्र राज्यातील गुरुमाऊलींना गेल्या तीन वर्षा पासून राज्य शाही थाटात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.

*रक्तदान शिबीर*  रक्तदान शिबीराचे आयोजन व तरुणांना रक्त दानाचे महत्त्व पटवून देणे प्रोबोधन करणे.

*विविध पुरस्कार*  १) स्व.जवाहरलाल दर्डा आदर्श शिक्षक पुरस्कार -औरंगाबाद  , २) बाप काव्य पुरस्कार -एल्गार साहित्य परिषद पुणे.
३) गणेश उत्सव लेझीम प्रथम पुरस्कार तसेच आंतर शालेय अनेक पुरस्कार
४) काव्यमंच अक्कलकोट येथे कविकट्टा अध्यक्ष पुरस्कार
५) राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड पुणे येथे उदघाटक म्हणून निवड व गौरव सन्मान
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*

Monday, 10 April 2017

बघ सखे तुला आठवतय का..?

बघ सखे तुला आठवतय का..?

*बघ सखे तुला आठवतय का..?*
तुझी ती ओढणी मागे पुढे फेकणे
आणि मागे ओळून पाहतांना
लटकेच वेणी मागे फेकणे..........  

*बघ सखे तुला आठवतय का..?*
पुढे पुढे चालतांना
लटकेच ओढणी डोक्यावर घेणे
आणि मागे ओळून पाहतांना
मैञींनींना टाळीवर टाळी देणे.....

*बघ सखे तुला आठवतय का..?*
रस्ता ओलांडण्याच्या बाहाण्याने
लटकेच मागे मुर्डून पाहणे
आणि मागे मुर्डून पाहतांना
नजर चूकवून नजरे आड होणे....

*बघ सखे तुला आठवतय का..?*
प्रश्न हा शब्द चूकीचा आहे
लटकेच वर्गात मोठ्याने सांगणे
आणि खाली मान घालून हसता हसता
त्या चोरट्या नजरेने फळ्याकडे पाहणे

*बघ सखे तुला आठवतय का*
तु ट्रेनिंग मध्ये आरपीज होतीस
इंग्रजीच्या कविता तु गात होतीस
आणि शिकवता शिकवता डोळे भरुन
आम्हा शिक्षकाकडे मायेने पाहत होतीस.......

*बघ सखे तुला आठवतय का..?*
परिक्षेच्या वेळी विद्यापिठात भेटतांना
उन्हांतच एकमेकांशी गाप्पा मारताना
आणि दोघांची नजरेसमोर नजर भिडतांना
मनात भिती होती तुला बोलतांना....

*बघ सखे तुला आठवतय का..?*
तुला पाहण्यासाठी शाळेत माझे येणे
काही तरी बहाण्याने तुला तिथे भेटणे
आणि उरात भिती असतांना लटकेच
दोन शब्द बोलून नजरे आड होणे

*बघ सखे तुला आठवतय का..?*
आपली बोलण्याची वेळ ठरलेली  असायची
दुपारची दोनची वेळ ती असायची
आणि फोनची बँटरी लो होउस्तर
गप्पागोष्टीची मैफिल ती रंगायची

*बघ सखे तुला आठवतय का...?*
एक दीवस नाही बोललो तर....
सखे तुला तरी करमते  का ?
आणि माझी काय अवस्था होत असेल
हे तरी तुला समजते का...?

*बघ सखे तुला आठवतय का...?*
ते कडूनिंबाच सावलीचं झाड
त्या झाडाच्या सावलीत आपण उभे होतो
आणि जे काही बोललो ते लिंबाचं झाड साक्षीदार होते...

*बघ सखे तुला आठवतय का...?*
मी चौदा वर्षे रामाचा वणवास भोगला
तु ही सितेचा वणवास भोगला
आणि शेवटी भेट ही झालीच
*बघ सखे तुला आठवतय का...?*

                                       कवि
                       *रामदास वाघमारे*

एल्गार राज्यस्तरीय साहित्य समेलन सेलू

*मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा*-
           *संमेलनाध्यक्ष राजन लाखे*

सेलू :  मराठी भाषेला एक वैभवशाली वारसा असून अमृताषतही पैजेशी जिंकणाय्रा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असे प्रतिपादन  साई नाट्य मंदीर, छञपती संभाजी राजे साहित्य नगरी ,अण्णा भाऊ साठे साहित्य सभागृहात  आयोजित पहिल्या एल्गार  राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन प्रसंगी ,महात्मा फुले विचार मंचावर राजन लाखे बोलत  होते.
      आपल्या भाषणात पुढे राजन लाखे म्हणाले की, " आपण सर्व भेद दूर सारून समतेन वागले पाहिजे . माणूस म्हणून जगले पाहिजे . साहित्यिक म्हणून आपली भुमिका समजून घेऊन माणूस धर्म आपण जागवला पाहिजे.
   साहित्य संमेलनाचे उद् घाटन आ. विजय भांबळे यांच्या हस्ते झाले . प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऊज्वला राठोड, न.प.सदस्य विश्रांती जाधव,जिल्हा परिषदेचे सभापती अशोक काकडे, मराठी पञकार संघाचे तालूकाध्यक्ष विलास शिंदे , डॉ. विलास मोरे ,डी.बी.शिंदे, रामदास वाघमारे ,डाँ.संदीप तुपे,गणेश सुलताने  कॉ.महेंद्रकुमार गायकवाड,माउली ताठे यांची उपस्थिती होती .
   आपल्या उद् घाटनाच्या भाषणात आमदार विजय भांबळे म्हणाले की, " युवकांनी आपले कर्तव्य प्रमाणिकपणे पार पाडायला हवे. सोशल मिडीया, मोबाइलमध्ये गुंतून नजाता , स्पर्धा परीक्षा देऊन आपले भविष्य घडविले पाहीजे . पुस्तकांच्या वाचनातून स्वतःला समृद्ध करायला हवे."
    डॉ. सुरेश शेळके यांनी ही या प्रसंगी समयोचित भाषण केले . कार्यक्रमाचे प्रसाविक सर्जेराव लहाने यांनी केले . भुमिका न.प.सदस्य रहिम खान पठाण यांनी विषद केली . सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन  दिगंबर रोकडे यांनी केले.

Tuesday, 14 March 2017

संत तुकाराम

संत तुकाराम जीवन गाथा   

संत तुकाराम

ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव 

संत तुकाराम

मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

जन्म इ.स. १५९८

देहू, महाराष्ट्र

निर्वाण इ.स. १६५०

देहू, महाराष्ट्र

संप्रदाय वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय

गुरू केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर

शिष्य निळोबा बहिणाबाई भगवानबाबा

भाषा मराठी

साहित्यरचना तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)

कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

संबंधित तीर्थक्षेत्रे देहू

व्यवसाय वाणी

वडील बोल्होबा अंबिले

आई कनकाई

पत्नी आवळाबाई/आवडा)

अपत्ये महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई,

*हा लेख वारकरी संत तुकाराम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तुकाराम (निःसंदिग्धीकरण).*

*संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा, तुका, तुक्या) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.*


तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.


‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.


‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले.देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.


भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.


*जीवन*


तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.


त्यांचे घराणे मोरे क्षत्रिय आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.


तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..


तुकारांमांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले.

देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.


फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे निधन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.


वंशावळी संपादन करा


विश्वंभर आणि आमाई अंबिले

यांना दोन मुले हरि व मुकुंद


यातील एकाचा मुलगा विठ्ठल

दुसर्‍याची मुले -

पदाजी अंबिले

शंकर अंबिले

कान्हया अंबिले

बोल्होबा आणि कनकाई अंबिले

यांना दोन मुले


सावजी (थोरला) तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले.

तुकाराम (धाकटा)

*जीवनोत्तर प्रभाव*


संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.(student) तुकारामांनीं तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.[संदर्भ हवा] यावरून तुकाराम महाराज पाळीत असलेल्या धर्माचे स्वरूप किती उदार होते याची कल्पना यावी.


*तुकारामांनी लिहिलेली पुस्तके*


गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा "गीतगाथा" हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.

तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू लिपीत लिप्यंतर (लेखक - कर्णे गजेंद्र भारती महाराज)

तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)

दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)

श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)