बघ सखे तुला आठवतय का..?
*बघ सखे तुला आठवतय का..?*
तुझी ती ओढणी मागे पुढे फेकणे
आणि मागे ओळून पाहतांना
लटकेच वेणी मागे फेकणे..........
*बघ सखे तुला आठवतय का..?*
पुढे पुढे चालतांना
लटकेच ओढणी डोक्यावर घेणे
आणि मागे ओळून पाहतांना
मैञींनींना टाळीवर टाळी देणे.....
*बघ सखे तुला आठवतय का..?*
रस्ता ओलांडण्याच्या बाहाण्याने
लटकेच मागे मुर्डून पाहणे
आणि मागे मुर्डून पाहतांना
नजर चूकवून नजरे आड होणे....
*बघ सखे तुला आठवतय का..?*
प्रश्न हा शब्द चूकीचा आहे
लटकेच वर्गात मोठ्याने सांगणे
आणि खाली मान घालून हसता हसता
त्या चोरट्या नजरेने फळ्याकडे पाहणे
*बघ सखे तुला आठवतय का*
तु ट्रेनिंग मध्ये आरपीज होतीस
इंग्रजीच्या कविता तु गात होतीस
आणि शिकवता शिकवता डोळे भरुन
आम्हा शिक्षकाकडे मायेने पाहत होतीस.......
*बघ सखे तुला आठवतय का..?*
परिक्षेच्या वेळी विद्यापिठात भेटतांना
उन्हांतच एकमेकांशी गाप्पा मारताना
आणि दोघांची नजरेसमोर नजर भिडतांना
मनात भिती होती तुला बोलतांना....
*बघ सखे तुला आठवतय का..?*
तुला पाहण्यासाठी शाळेत माझे येणे
काही तरी बहाण्याने तुला तिथे भेटणे
आणि उरात भिती असतांना लटकेच
दोन शब्द बोलून नजरे आड होणे
*बघ सखे तुला आठवतय का..?*
आपली बोलण्याची वेळ ठरलेली असायची
दुपारची दोनची वेळ ती असायची
आणि फोनची बँटरी लो होउस्तर
गप्पागोष्टीची मैफिल ती रंगायची
*बघ सखे तुला आठवतय का...?*
एक दीवस नाही बोललो तर....
सखे तुला तरी करमते का ?
आणि माझी काय अवस्था होत असेल
हे तरी तुला समजते का...?
*बघ सखे तुला आठवतय का...?*
ते कडूनिंबाच सावलीचं झाड
त्या झाडाच्या सावलीत आपण उभे होतो
आणि जे काही बोललो ते लिंबाचं झाड साक्षीदार होते...
*बघ सखे तुला आठवतय का...?*
मी चौदा वर्षे रामाचा वणवास भोगला
तु ही सितेचा वणवास भोगला
आणि शेवटी भेट ही झालीच
*बघ सखे तुला आठवतय का...?*
कवि
*रामदास वाघमारे*
No comments:
Post a Comment