Monday, 10 April 2017

एल्गार राज्यस्तरीय साहित्य समेलन सेलू

*मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा*-
           *संमेलनाध्यक्ष राजन लाखे*

सेलू :  मराठी भाषेला एक वैभवशाली वारसा असून अमृताषतही पैजेशी जिंकणाय्रा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असे प्रतिपादन  साई नाट्य मंदीर, छञपती संभाजी राजे साहित्य नगरी ,अण्णा भाऊ साठे साहित्य सभागृहात  आयोजित पहिल्या एल्गार  राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन प्रसंगी ,महात्मा फुले विचार मंचावर राजन लाखे बोलत  होते.
      आपल्या भाषणात पुढे राजन लाखे म्हणाले की, " आपण सर्व भेद दूर सारून समतेन वागले पाहिजे . माणूस म्हणून जगले पाहिजे . साहित्यिक म्हणून आपली भुमिका समजून घेऊन माणूस धर्म आपण जागवला पाहिजे.
   साहित्य संमेलनाचे उद् घाटन आ. विजय भांबळे यांच्या हस्ते झाले . प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऊज्वला राठोड, न.प.सदस्य विश्रांती जाधव,जिल्हा परिषदेचे सभापती अशोक काकडे, मराठी पञकार संघाचे तालूकाध्यक्ष विलास शिंदे , डॉ. विलास मोरे ,डी.बी.शिंदे, रामदास वाघमारे ,डाँ.संदीप तुपे,गणेश सुलताने  कॉ.महेंद्रकुमार गायकवाड,माउली ताठे यांची उपस्थिती होती .
   आपल्या उद् घाटनाच्या भाषणात आमदार विजय भांबळे म्हणाले की, " युवकांनी आपले कर्तव्य प्रमाणिकपणे पार पाडायला हवे. सोशल मिडीया, मोबाइलमध्ये गुंतून नजाता , स्पर्धा परीक्षा देऊन आपले भविष्य घडविले पाहीजे . पुस्तकांच्या वाचनातून स्वतःला समृद्ध करायला हवे."
    डॉ. सुरेश शेळके यांनी ही या प्रसंगी समयोचित भाषण केले . कार्यक्रमाचे प्रसाविक सर्जेराव लहाने यांनी केले . भुमिका न.प.सदस्य रहिम खान पठाण यांनी विषद केली . सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन  दिगंबर रोकडे यांनी केले.

No comments:

Post a Comment