Monday, 9 July 2018

गुरुजींच्या या लाडक्या मुलांनो......

*गुरुजींच्या या*
*लाडक्या मुलांनो....!*

गुरुजींच्या या
लाडक्या मुलांनो
शाळेला जावू चला
गुरुजींची अज्ञा पाळू चला...

आता छडी नाही
भिती नाही
शाळेला जावू चला
गुरुजींची आज्ञा पाळू चला....

आता आनंददाई शिक्षण
गुरुजी सोबत नाचू चला
शाळेला जावू चला
गुरुजींची आज्ञा पाळू चला....

कृतीयुक्त शिक्षणातून
ज्ञान मिळवू चला
शाळेला जावू चला
गुरुजींची आज्ञा पाळू चला....

ज्ञानरचनावादातून
ज्ञान मिळवू चला
शाळेला जावू चला
गुरुजींची आज्ञा पाळू चला....

                            कवी
                     रामदास वाघमारे
                  मो.8888125610

Saturday, 7 July 2018

विठ्ठल नामाची

विठ्ठल नामाची...

विठ्ठल नामाची
दिंडी चालली
दिंडी चालतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
वारी सजली
वारी चालतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
गाणी गायली
गाणी ही गातांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
माळ घातली
माळ घालतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
ओढ लागली
ओढ लागतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
आस लागली
आस लागतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
भूक लागली
भूक लागतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली

विठ्ठल नामाची
शाळा भरली
शाळा शिकतांना
तानभूक हरली

विठ्ठल नामाची
दिंडी चालली
                         कवी
                रामदास वाघमारे
             मो.8888125610

पांडूरंग

पांडूरंग

आम्ही वारकरी
निघालो पंढरी
नाचे वाटेवरी
पांडूरंग

विठ्ठू नामाचा
गातो मी अभंग
नाचूनिया दंग
पांडूरंग

वाट पंढरीची
चाले वारकरी
तुका म्हणे जरी
पांडूरंग

ध्यास लागला रे
पांडूरंगा तुझा
वारी मध्ये गातो
पांडूरंग

आस ती लागली
तुझ्या या भेटीची
माळ तुळसीची
पांडूरंग

माय रुखमीनी
बाप पांडूरंग
गावूनी अभंग
पांडूरंग

टाळ मृदूंगाचा
नाद पांढरीत
नाचतो वारीत
पांडूरंग

एकची मागणे
सुखी ठेव देवा
स्वास माझा व्हावा
पांडूरंग

जगी माझा विठ्ठू
दिसे भजनात
माळ ती गळ्यात
पांडूरंग
                       कवी
                   रामदास वाघमारे
             मो.8888125610