Tuesday, 31 July 2018

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन*

जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )--  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक , सामाजिक  मासिकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २८ सप्टेंबर २०१८ पर्यत पाठवायचे आहे
    राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक ,  सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक ,सामाजिक  मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी  सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
          शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  २८ सप्टेंबर २०१८ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक श्रीमती राजश्री पल्लेवाड मो.नं. ९४०३०४४००५ ,
  कार्यकारी संपादक तथा मुख्याध्यापक संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 ,  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे,श्रीमती  कल्पना फुसे, डाँ.रत्ना चौधरी, श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,  डि.बी .शिंदे ऊर्फ शब्दधन, बाळासाहेब निकाळजे, प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस, विजय पाताडे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

*नियम व अटी*
१)  पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg  पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात मुख्याध्यापकांचे हमी पञ नसल्यास  प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१९  असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे  स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा वार्षिक सभासद असेल तर ३ गुण , द्विवार्षीक सभासद असेल तर ५ गुण आणि अजीवन सभासद असल्यास १० गुण दिले जातील.
           *टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता,  प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी  माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री - वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
शरद ठाकर - *परभणी*
प्रविण डाकरे-  *सांगली*
महादेव हवालदार - *सांगली*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
महादेव खळुरे - *लातूर*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
सुनिल मोरे - *धुळे*
उमेश खोसे - *उस्मानाबाद*
गणेश सुलताने - *जालना*
मु.अ. अनिता कांबळे - *रायगड*
     *असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*

ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

Friday, 20 July 2018

खरे सांगा मला....!

*खरे सांगा मला....!*

असा कोण आहे बरे
या जगात नाही दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

एक असा दावा मला
पृथ्वी तलावर सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

किती कमविला पैसा
तरी अंतर मन दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

तुमच्या माझ्या पासून
टाटा अंबानी पर्यंत दुःखी
एक तरी आहे का हो
कुणी आजपर्यंत सुखी

ज्याचे त्याचे कर्म जैसे
तसे फळ त्याच्या मुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

संत कबिर सांगत
ज्यादा धन पायो दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

देव मानसात शोधा
मग तुम्ही आसाल सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी राहील का हो दुःखी

                              कवी
                      रामदास वाघमारे
               मो. 8888125610

Monday, 16 July 2018

जीवन गौरवने आम्हाला काय दिले - शब्दधन डि.बि

*जीवन गौरवने आम्हाला काय दिले.*
                   शब्दधन डीबी,पुणे-३३.
       ( पुणे जिल्हा संपादक )
जे काय दिले ते आम्हाला जीवन गौरवनेच दिले.
असे मला म्हणायला आवडेल.जीवन गौरव म्हणजे उगवता सूर्य आणि प्रत्येकाच्या मनातील
चमचमता तारा आहे. मन जेव्हा काही विचार करते तेव्हा जीवन गौरव आठवतो. जीवन गौरव
या शब्दातच किती मोठी ताकद आहे.जीवन गौरव म्हणजे हलते-झुलते विचारपीठ तर आहेच
आहे...परंतू माणसे जोडणारे एक विद्यापीठ आहे
व त्या विद्यापीठाचा कुलगुरु माझा भाऊ वाघमारे
दादा आहे...दादा या शब्दातच खरे विचार व ताकद आहे...दादा म्हंटले की,माझे विचार पारच
लिन होतात व मायेचा पाझर फुटतो...दादा म्हंटल की, मला माझा सख्खा भाऊ सुरेश दादा
शिंदे आठवतो की, ज्या व्यक्तीने रयत शिक्षण संस्था सातारा येथे 'कमवा आणि शिका' या योजनेतंर्गत शिक्षण घेतले व पोलिस खत्यातील
ऑफसर सुप्रिडेट हे पद भूषविले...परंतु काळच्या ओघात दादावर काळानेच झडप घातली व चालता-बोलता ड्यूटीवर असतानाच
तो आम्हाला वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षीच सोडून गेला. तन मन आणि धनाने माझ्याबरोबर
असलेला तो स्त्रोत म्हणजे शब्दधन सुरेश दादा
शिंदे आमचे थोरले बंधू मला स्वतःच्या पायावरच
उभे करून गेले नाहीत तर त्यांनी माणसे जोडण्याचे तंत्रज्ञान मला देऊन गेले. अतिउच्च
शब्दात बोलायचे झाले तर दादा आज असता तर
म्हंटला असता,"डिगड्या,किती माणसे जमवल्यात...परंतु हात ओला तर मैतर भला असे कधीही वागू नकोस," तेच अभिवचन आज
जपतोय व फक्त निर्व्याज साहित्य सेवा करतोय
त्याच्या स्मरणार्थ... माणसे म्हणतात... शिंदे जवळ खूप पैसे आहेत.म्हणून तो हे सारे
नखरे करतो...परंतु तसे काही नाही हो,अतिशय
नम्रपणे सांगतो. माझी माणसे आणि माझी कविताच माझे दैवत आहे. शास्वत जगायला शिकवले मला या दोघांनीच. कविता ही आलीकडची बाब आहे,परंतु दादा मात्र फार जुने
बाळकडू आहे. किती जणांना किती मदत केली.
कशी मदत केली हे कधीही सांगणार नाही आणि
दिलेला शब्द कधीही मोडणार नाही. हेच ते बाळकडू जपत रहाणार व पुढे-पुढे जाणार...
आता फसगत कोण करणार नाही याची खात्रीच
नाही झाली तर आत्मविश्वासही वाढलाय माझा..
वाघमारे दादा व अख्खी जीवन गौरव टिम आणि
माझी शब्दधन जीवन गौरव काव्यमंच टिम सदैव
माझ्याबरोबर आहेत पाठीराखा म्हणून...कुणाची
स्तुती म्हणून नाही किंवा आत्मस्तुती म्हणून हे सारे लिहित मुळीच नाही...अंतकर्णातून आलेले
हे शब्दधन आहे. उगच खुळ्या मनाची समजुत घालण्यासाठी लिहिलेले हे शब्दधन नाही. मी
धनाने फार श्रीमंत आहे. असे मुळीच नाही, परंतु
मनाने निश्चितच श्रीमंत आहे. व्यथा माझी कुणालाच सांगत नाही व सांगणारही. दादा माझा
असता तर निश्चितच सांगितलीही असती,परंतु आज वाघमारे दादाच्या रूपाने ती उणीव भरून
निघाली म्हणून हा शब्द प्रपंच...
       जीवन गौरवने मला काय दिले नाही असे
विचारले असते तर मी काहीच सांगू शकलो नसतो,परंतु काय दिले हे सांगण्यासाठी ही माझ्याकडे काहीच नाही, "निशब्द आहे मी ढाण्या वाघ दादा तुमचा असेच म्हणेन...!' परंतु
दादाच्या आग्रहाखातर आणि तमाम वाचक बंधू
भगीनींना जीवन गौरवचा एक स्तभ म्हणून सांगणे आवश्यक आहे. दादा तुम्ही कराच आम्ही
पाठीशी आहोत असे म्हणणारी मंडळी जीवन
गौरव सोडून मला कुठेही मिळली नाहीत आणि
मिळणारही नाहीत. एकहाती जीवन गौरवचा
कारभार पहाणारे आणि आमचा विचार घेतल्याशिवाय पुढे न जाणारे दादा म्हणजे...ग्रेट
व्यक्तिमत्व... मला तर वयोवृद्ध होण्याच्या आगोदरच हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. दादांनी मला सेप्रेट शब्दधन जीवन गौरव
काव्यमंच देऊन टाकला आहे.यापलीकडे मी काहीच सांगणार नाही. सांगण्यापेक्षा कामातून
दाखवून देणार आहे. माणसाचे विचार जुळले
की मने जुळतात.येथे ना कुणाचा स्वर्थ ना फायदा. निस्वार्थ हा एकमेव उद्देश घेऊन सर्वच
माणसे जेव्हा नितळ मनाने एकत्र येतात तेव्हाच
काहितरी चांगले घडते.असे माझे स्वतःचेच मत
आहे.बाकी पैसापाणी, मानपान गौण आहे.तुम्ही
किती धनदौलत साठवता त्यापेक्षा किती माणसे
जोडता हे महत्त्वाचे आहे...आणि तेच जीवन गौरवने दिले आहे. मी एक साधाभोळा शिक्षक आहे.असे म्हणण्याची माझी हिंमत होणार नाही
निदान माझ्या जीवन गौरवचा ढाण्यावाघ म्हणून
तरी....या ढाण्यावाघ तुमची वाट बघतोय ...शब्दधन जीवन गौरव वाढवायला...
मी तयार झालोय तुमच्या स्वगतला आता कधीपण म्हणायला... मी पिंपरी चिंचवडमध्ये तन मन धन अर्पण करून तयार आहे. कारण
माझे पदाधिकारी मा.दीपक अमोलिक सर,
रूपाताई बेंडे, मनिषाताई भोसले,सीमाताई गांधी
व बाबू डिसोजा डिसोजा पारखून घेतलेले हिरेच
आहे...जय जीवन गौरव..!!…
-----------------------------------------------------
शब्दधन डीबी,पुणे-३३.