*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्तावाचे आवाहन*
जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )-- बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या वतीने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार मासिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे. आपल्या शैक्षणिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : ३० आँक्टोबर-२०१७ पर्यत पाठवावयाचे आहे प्रस्तावात अर्जदाराने प्रतिज्ञापञ स्वतः लिहावे व सही करावी.
राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने करीत आहेत. त्यात सामाजिक कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलिंचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शाल श्रीफळ,मानपत्र, विशेषांक, आणि स्मृतीचिंन्ह सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक : ३० आँक्टोबर -२०१७ पर्यत संयोजक *संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , आम्रपाली बुध्द विहाराच्या बाजूला , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९* या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचित्रासह पाठवावयाचे आहेत. असे आवाहन जीवन गौरव संयोजक समिती महाराष्ट्र राज्य करीत आहे. पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता, प्रिंटमिडीयातून तसेच whatsup च्या माध्यमातून कळविले जाईल.अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
*( १) संपादक - रामदास वाघमारे ( मो.नं . 8888125610) ,*
*( २) कार्यकारी संपादक डाँ.संदीप काकासाहेब तुपे (मो.नं.9049111653)*
*(३) उप संपादक श्रीमती राजश्री रामराव पल्लेवाड ( मो.नं .9403044005)*
सर्वश्री - सहसंपादक दिगंबर बापु शिंदे *(पुणे जिल्हा )* , बाळासाहेब निकाळजे *(औरंगाबाद जिल्हा)*, संदीप ढाकणे *(औरंगाबाद जिल्हा)* शरद ठाकर *(परभणी जिल्हा)*, सुनिल मोरे *(धूळे जिल्हा)* , श्रीमती कल्पना फुसे *(औरंगाबाद जिल्हा)* , श्रीमती रुपाली बोडके *( नासिक जिल्हा)* श्रीमती वैशाली भामरे, *(मालेगाव नासिक जिल्हा)* श्रीमती वीणा माच्छी *(पालघर जिल्हा)* , श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन *( बीड जिल्हा)* , श्रीमती मीरा गणगे *(हिंगोली जिल्हा)*, श्रीमती एस.व्ही. हमने, *(हिंगोली जिल्हा)* श्रीमती गिता केदारे *( मुंबई जिल्हा)*, श्रीमती प्रतिभा सिरभाते *(अकोला जिल्हा)*, डॉ. रत्ना चौधरी *( वर्धा जिल्हा)* , दिनेश वाडेकर *(नंदूरबार जिल्हा)*, प्रा.डाँ.अशोक डोळस *( अहमदनगर जिल्हा)*, प्रा.डाँ. सतीश मस्के *( धूळे जिल्हा)*, उमेश खोसे *(उस्मानाबाद जिल्हा)* , गणेश सुलताने *( जालना जिल्हा)*, प्रविण डाकरे *( सांगली जिल्हा)*, पंडीत डोंगरे *( औरंगाबाद जिल्हा)*, नागनाथ घाटुळे *( सोलापूर जिल्हा)*, उमाकांत बांगडकर *( नागपूर जिल्हा)*, दयानंद बिराजदार *( लातुर जिल्हा)*, गोपाळ सुर्यवंशी *(पालघर जिल्हा)*, संदीप सोनवणे *(औरंगाबाद जिल्हा)*,
असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रस्ताव सादर करावयाचा अंतिम दिनांक: *३० ऑक्टोबर २0१७*मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
*( टिप* :--- *नियम व अटी लागू.पुरस्कार साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी जीवन गौरव मासिकाचे वैयक्तिक वर्गणीदार-सभासद असणे बंधनकारक आहे- आजीवन वर्गणीदारास प्राधान्य)*
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव
मा.संपादक,
ReplyDeleteआपल्या संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार देणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा मिळेल .
आपले कार्य कौतुकास्पद आहे
ReplyDeleteखुपच छान उपक्रम....
ReplyDeleteस्तुत्य...
खूप छान संकल्पना . शुभेच्छा !
ReplyDeleteहा उपक्रम नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.विद्यादानाचे पवित्र कार्य करण्यास बळ देणारा आहे.
ReplyDelete