राज्यातील ४७ शिक्षकांना बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी l औरंगाबाद , बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे राज्यातील ४७ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा १३ जानेवारीला औरंगाबाद येथील तापडीया नाट्यगृह निराला बाजार येथे पार पडणार आहे. अशी माहीती बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष , सचिव , उपध्यक्ष, कोषाध्यक्ष,इतर सदस्य यांनी दिली. या निवडीचे स्वागत रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, मु.अ. संदिप सोनवणे, मीरा वाघमारे यांनी पुरस्कार्थांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.
सदरील पुरस्कारासाठी या ४७ शिक्षकांची निवड समितीने नावे नुकतीच जाहीर केली आहे. सदर पूरस्कारासाठी या सर्व शिक्षकांचे शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १) औरंगाबाद शहरातील शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयातील सहशिक्षक शंकर दादाराव भडगे तसेच २) औरंगाबाद शहरातील शिवशंकर काॕलनीतील संस्कार प्रबोधिनी शाळेतील सहशिक्षक सुनिल अभिमन निकम , ३) हर्सूल येथील न्यू हायस्कूलचे शिक्षक अमोल भुजंगराव देवडे , ४) पळशी ता.जि.औरंगाबाद येथील जि.प.प्रा. शाळेतील शिक्षिका स्वाती भगवान गवई यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
५) बीड जिल्ह्यातील व तालुक्यातील जरुड केंद्राअंतर्गत ढेकणमोहा जि.प.प्रा. शाळेतील शिक्षिका उषा बप्पासाहेब ढेरे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
६) उस्मानाबाद जिल्ह्यातील चार शिक्षकांना 'राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाईल. यामध्ये कळंब तालुक्यातील शेलगाव जि.प. प्रा. शाळेचे सहशिक्षक हनमंत सोपान पडवळ, ७) परंडा तालुक्यातील शिंदेवस्ती जि.प.प्रा.शाळेचे सहशिक्षक सुखदेव विष्णू भालेकर , ८) भूम शहरातील रविंद्र हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती किरण बाजीराव ठाणांबीर , ९) उस्मानाबाद तालुक्यातील किणी जि.प. शाळेतील श्रीमती संगीता उत्तमराव थडवे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
१०) परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव जि.प. शाळेचे शिक्षक गणेश शाहुराज तोडकर , ११) तसेच याच तालुक्यातील चुकारपिंपरी येथील जि.प. शाळेतील शिक्षक प्रमोद बब्रूवान जाधव यांना सदरील ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे .
१२) लातूर जिल्ह्यातील चार शिक्षकांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाईल. त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील कुमठा ब्रु. येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक दिपक धोंडीराम हालकंचे , १३) रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील जि.प.प्रा. शाळेच्या सहशिक्षिका सत्यशीला महालिंगप्पा कलशेट्टी , १४) देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा येथील जि.प. प्रा. शाळेचे सहशिक्षक सुशीलकुमार मुरलीधर पांचाळ, १५) लातूर तालुक्यातील जेवळी जि.प.प्रा. शाळेतील सहशिक्षिका श्रीमती छाया गोविंदराव देशपांडे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
१६) अहमदनगर जिल्ह्यातून अकोले शहरातील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सय्यद दिलशाद यासीन , १७) व नगर शहरातील निर्मलनगर रोडवरील श्री नाथ विद्यामंदीराचे देविदास शिवाजी बुधवंत यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
१८) पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील जि.प. मराठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती मनिषा रामचंद्र मुळूक यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातून चार शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दिला जाईल. १९) त्यात फलटण तालुक्यातील कारंडेवस्ती ( भलवडी) जि.प.शाळेतील गणेश भगवान तांबे , २०) जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी जि.प. शाळेच्या श्रीमती अंजली शशीकांत गोडसे , २१) खटाव तालुक्यातील भुरकवाडी जि.प. शाळेच्या श्रीमती रुपाली मधुकर सुतार , २२) माण तालुक्यातील हिंगणे जि.प. शाळेचे विजयकुमार रामचंद्र काळे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
२३) सांगली जिल्ह्यातून मिरज तालुक्यातील मळाआरग जि.प. शाळेतील सहशिक्षक पोपट शिवाजी निकम , २४) कवढे महांकाळ तालुक्यातील खारसिंग जि.प. शाळेतील तारीश आब्बास अत्तार , २५) तासगाव तालुक्यातील दहिवडी जि.प. शाळेचे सहशिक्षक अजय महादेव काळे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
२६) नाशिक जिल्ह्यातून येवला तालुक्यातील चिंचोडी खुर्द येथील जि.प. शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती संगीता शिवाजी शिंदे , २७) इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे जि.प. शाळेतील सहशिक्षक अतुल अशोकराव अहिरे , २८) येवला तालुक्यातील धामणगाव जि.प. शाळेचे सहशिक्षक ज्ञानदेव सहादू नवसरे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
२९) जळगाव जिल्ह्यातून अंमळनेर तालुक्यातील निंभोरा माध्यमिक विद्यालयाचे नारायण रमण चौधरी ३० ) व जामनेर तालुक्यातील ढालगाव जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक संदिप जगन्नाथ पाटील यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
३१) पालघर जिल्ह्यातून डहाणू तालुक्यातील खानीव जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक संतोष भगावान तळेकर यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
३२) ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील शिक्षणशास्ञ महाविद्यालयातील प्रा.भगवान हरी विशे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
३३) रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील दहिगाव जि.प.शाळेतील सहशिक्षक संतोष गोपा दातीर , ३४) पेण तालुक्यातील गौळणवाडी जि.प. शाळेच्या सहशिक्षिका ज्योती दिपक अवघडे , ३५) श्रीवर्धन तालुक्यातील भरडगोल जि.प. शाळेचे सहशिक्षक संदिप नथुराम भायदे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाणार आहे.
३६) घाटकोपर मुंबई येथील भटवाडी येथील स्वामी रामानंद हायस्कूलच्या सहशिक्षिका श्रीमती अनिता मिलिंद चव्हाण यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
३७) रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातील नाणीजगुरव शिवगणवाडी जि.प.प्रा. शाळेतील सहशिक्षिका श्रीमती श्रध्दा सुहास मोहिते यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
३८) सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली तालुक्यातील जि.प. शाळा क्रमांक ३ मधील सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
३९) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंकगले तालुक्यातील इंचलकरंजी हायस्कूल येथील सहशिक्षक उत्तम आनंदा हवालदार यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
४०) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंबाड येथील यशवंत प्रायमरी स्कूलचे सहशिक्षक सोमनाथ राजाराम होनमोटे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
४१) अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदळी खुर्द येथील देशभक्त कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.भास्कर सदाशिव काळे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
४२) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब जि.प.शाळेतील शिक्षिका श्रीमती संगीता रविंद्र तट्टे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाईल.
४३) चंद्रपूर जिल्ह्यातून गोंडपिंपरी तालुक्यातील गंगाराम तळोदी येथील जि.प.शाळेतील सहशिक्षक दुशांत बाबूराव निमकर यांना ४४) व गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी केंडातील मोहोळी जि.प. प्रा. शाळेतील सहशिक्षक मारोती बिराजी आरेवार यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
४५) वर्धा जिल्ह्यातून वर्धा शहरातील केसरीमल कन्या हायस्कूलमधील श्रीमती मनिषा विनायक साळवे यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
४६) नंदूरबार जिल्ह्यातील बामडोद जि.प. शाळेतील सहशिक्षक आनंदराव संपतराव करनकाळ यांना हा पुरस्कार दिला जाईल.
४७) धुळे जिल्ह्यातून साक्री तालुक्यातील पिंपळगाव येथील सायजाबाई आदिवासी माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक विजय पांडुरंग सुर्यवंशी यांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.