Thursday, 22 November 2018

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर

*जीवन गौरव च्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर*
   औरंगाबाद (प्रतिनिधी ) जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय व बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा राज्य भरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली हीती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यानूसार एकूण ९ शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यात प्रथम पारितोषिक विभागून देण्याचा व इतर ५ जणांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्याचा निर्णय  घेण्यात आला.
    सदर राज्यस्तरीय निबंध स्पर्धे विषयी अधिक  माहिती अशी की, या स्पर्धेत राज्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.एकूण दीडशे निबंधांपैकी ९ निबंध लेखक शिक्षकांना प्रथम, व्दितीय,तृतीय व ऊत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहे.
       या पुरस्कारांपैकी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात येईल. सदर प्रथम पुरस्काराचे मानकरी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक शंकर नामदेव गच्चे यांना व नाशिक जिल्ह्यातील आडगांव इंग्लिश  स्कूलच्या शिक्षिका  श्रीमती करुणा दिपक गायकवाड यांना विभागून दिले जाईल.सदर प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रक्कम २२२२/- रु. आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन गौरविले जाणार आहे.
        द्वितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक विजयकुमार रामचंद्र काळे यांना दिला जाणार आहे. यासाठी रोख रक्कम रु.११११/- व आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      तृतीय पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीर तालुक्यातील कोटगांव येथील कृषक विद्यालयातील सहशिक्षक प्रविण पंढरीनाथ पिसे यांना दिला जाणार आहे. यासाठी ७७७/- रू. रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल , श्रीफळ देऊन गौरविले जाणार आहे.
        उत्तेजनार्थ ५  पुरस्कार विजेत्यांमध्ये कांदिवली पूर्व मुंबई येथील अनुदत्त विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती प्रांजली अभय जोशी , परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाखा क्र.३ मधील सहशिक्षक मंगेश गोविंदराव पैंजणे, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील   जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक मनोहर ञ्यंबक आव्हाड , धूळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील जुनी सांवगी येथी जिल्हा परिषद शाळेच्या  सहशिक्षिका श्रीमती भूषणा पांडूरंग चौधरी तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती स्वाती सुनिल बडगुजर यांना सदर उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यासाठी  प्रत्येक विजेत्यास ५५५/- रु रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      सदर पुरस्कार वितरण येत्या १३ जानेवारीमध्ये जीवन गौरव मासिकाच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात केले जाणार आहेत. सदर सोहळा हा निराला बाजार , औरंगपुरा, औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृहात संपन्न होणार आहे.असे प्रसिद्धी पञकाद्वारे रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, मु.अ. संदिप सोनवणे, मीरा वाघमारे यांनी कळविले आहे.
                            आपला
                  रामदास वाघमारे
          मो. नं. 8888125610

No comments:

Post a Comment