संपादक रामदास वाघमारे
Tuesday, 11 April 2017
Monday, 10 April 2017
बघ सखे तुला आठवतय का..?
बघ सखे तुला आठवतय का..?
*बघ सखे तुला आठवतय का..?*
तुझी ती ओढणी मागे पुढे फेकणे
आणि मागे ओळून पाहतांना
लटकेच वेणी मागे फेकणे..........
*बघ सखे तुला आठवतय का..?*
पुढे पुढे चालतांना
लटकेच ओढणी डोक्यावर घेणे
आणि मागे ओळून पाहतांना
मैञींनींना टाळीवर टाळी देणे.....
*बघ सखे तुला आठवतय का..?*
रस्ता ओलांडण्याच्या बाहाण्याने
लटकेच मागे मुर्डून पाहणे
आणि मागे मुर्डून पाहतांना
नजर चूकवून नजरे आड होणे....
*बघ सखे तुला आठवतय का..?*
प्रश्न हा शब्द चूकीचा आहे
लटकेच वर्गात मोठ्याने सांगणे
आणि खाली मान घालून हसता हसता
त्या चोरट्या नजरेने फळ्याकडे पाहणे
*बघ सखे तुला आठवतय का*
तु ट्रेनिंग मध्ये आरपीज होतीस
इंग्रजीच्या कविता तु गात होतीस
आणि शिकवता शिकवता डोळे भरुन
आम्हा शिक्षकाकडे मायेने पाहत होतीस.......
*बघ सखे तुला आठवतय का..?*
परिक्षेच्या वेळी विद्यापिठात भेटतांना
उन्हांतच एकमेकांशी गाप्पा मारताना
आणि दोघांची नजरेसमोर नजर भिडतांना
मनात भिती होती तुला बोलतांना....
*बघ सखे तुला आठवतय का..?*
तुला पाहण्यासाठी शाळेत माझे येणे
काही तरी बहाण्याने तुला तिथे भेटणे
आणि उरात भिती असतांना लटकेच
दोन शब्द बोलून नजरे आड होणे
*बघ सखे तुला आठवतय का..?*
आपली बोलण्याची वेळ ठरलेली असायची
दुपारची दोनची वेळ ती असायची
आणि फोनची बँटरी लो होउस्तर
गप्पागोष्टीची मैफिल ती रंगायची
*बघ सखे तुला आठवतय का...?*
एक दीवस नाही बोललो तर....
सखे तुला तरी करमते का ?
आणि माझी काय अवस्था होत असेल
हे तरी तुला समजते का...?
*बघ सखे तुला आठवतय का...?*
ते कडूनिंबाच सावलीचं झाड
त्या झाडाच्या सावलीत आपण उभे होतो
आणि जे काही बोललो ते लिंबाचं झाड साक्षीदार होते...
*बघ सखे तुला आठवतय का...?*
मी चौदा वर्षे रामाचा वणवास भोगला
तु ही सितेचा वणवास भोगला
आणि शेवटी भेट ही झालीच
*बघ सखे तुला आठवतय का...?*
कवि
*रामदास वाघमारे*
एल्गार राज्यस्तरीय साहित्य समेलन सेलू
*मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा*-
*संमेलनाध्यक्ष राजन लाखे*
सेलू : मराठी भाषेला एक वैभवशाली वारसा असून अमृताषतही पैजेशी जिंकणाय्रा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असे प्रतिपादन साई नाट्य मंदीर, छञपती संभाजी राजे साहित्य नगरी ,अण्णा भाऊ साठे साहित्य सभागृहात आयोजित पहिल्या एल्गार राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन प्रसंगी ,महात्मा फुले विचार मंचावर राजन लाखे बोलत होते.
आपल्या भाषणात पुढे राजन लाखे म्हणाले की, " आपण सर्व भेद दूर सारून समतेन वागले पाहिजे . माणूस म्हणून जगले पाहिजे . साहित्यिक म्हणून आपली भुमिका समजून घेऊन माणूस धर्म आपण जागवला पाहिजे.
साहित्य संमेलनाचे उद् घाटन आ. विजय भांबळे यांच्या हस्ते झाले . प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऊज्वला राठोड, न.प.सदस्य विश्रांती जाधव,जिल्हा परिषदेचे सभापती अशोक काकडे, मराठी पञकार संघाचे तालूकाध्यक्ष विलास शिंदे , डॉ. विलास मोरे ,डी.बी.शिंदे, रामदास वाघमारे ,डाँ.संदीप तुपे,गणेश सुलताने कॉ.महेंद्रकुमार गायकवाड,माउली ताठे यांची उपस्थिती होती .
आपल्या उद् घाटनाच्या भाषणात आमदार विजय भांबळे म्हणाले की, " युवकांनी आपले कर्तव्य प्रमाणिकपणे पार पाडायला हवे. सोशल मिडीया, मोबाइलमध्ये गुंतून नजाता , स्पर्धा परीक्षा देऊन आपले भविष्य घडविले पाहीजे . पुस्तकांच्या वाचनातून स्वतःला समृद्ध करायला हवे."
डॉ. सुरेश शेळके यांनी ही या प्रसंगी समयोचित भाषण केले . कार्यक्रमाचे प्रसाविक सर्जेराव लहाने यांनी केले . भुमिका न.प.सदस्य रहिम खान पठाण यांनी विषद केली . सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन दिगंबर रोकडे यांनी केले.