Friday, 21 April 2023

होय मला अधिकारी व्हायचंय...!

*मला अधिकारी व्हायचंय...!!!!*

सर्वोदय कला मंडळ औरंगाबाद संचलित 

 *छत्रपती प्राथमिक विद्यालय प्राथमिक विभागाचा (उन्हाळी सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम 1001 प्रश्नाचे टार्गेट, पहिली ते सातवी साठी उपयुक्त)*

चला सामान्य ज्ञान वाढवूया!!!!!

*आशीर्वाद* 
स्व.मोतोश्री.कमळाबाई भिक्कन पाटील  
*संकल्पना व प्रेरणा*
मा. अध्यक्ष सुभाष पाटील साहेब
*मार्गदर्शन*
-मा. मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला व्यवहारे मँडम
*संकलन व निर्मिती*
- श्री.रामदास वाघमारे (सहशिक्षक)
*सुचना*-
दररोज पंधरा प्रश्न क्रमशः पाठवले जातील. त्याचा अभ्यास करावा व रविवारी ऑनलाईन चाचणी सोडवावी. 
*अधिकारी व्हायचे मला!!*
*नाविन्यपूर्ण उपक्रम*

चला सामान्यज्ञान वाढवूया....... 
दिनांक- 22/04/2023 वार-  शनिवार 

*3 रा  दिवस   ...भाग 3 क्रमशः-*

३१)महाराष्ट्रात पांडवलेणी कोणत्या शहरात आढळतात? उत्तर -नाशिक
३२) वेरूळ- अजंठा मध्ये कोणती लेणी प्रसिद्ध आहेत?
उत्तर -बौद्ध लेणी
३३) नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
उत्तर -गोदावरी
३४) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर -कळसुबाई
३५) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- पुणे
३६) महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कोणते?
उत्तर -लावणी
३७) महाराष्ट्रात साजरा करण्यात येणारा प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव कोणता?
उत्तर -गणपती उत्सव
३८) महाराष्ट्रात पैठणी कुठे तयार केली जाते?
उत्तर -येवला
३९) जळगाव हे कुठल्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर -केळी
४०) महाराष्ट्रात काजू साठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर -मालवण
४१) स्ट्रॉबेरी साठी कुठले शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर -महाबळेश्वर
४२) महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता?
उत्तर -कबड्डी
४३) महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते?
उत्तर -पुणे
४४) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे?
उत्तर -मुंबई
४५) महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर -१ मे

*संकलन व निर्मिती*
श्री.रामदास वाघमारे सर
सदर प्रश्नावली ब्लॉगवर उपलब्ध
http://jeevangaurav.blogspot.com/2023/04/blog-post.html

*सहकार्य सर्व शिक्षक वृंद* 
छत्रपती प्राथमिक विद्यालय गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर

Wednesday, 19 April 2023

मला अधिकारी व्हायचंय...!

*अधिकारी व्हायचे मला...!!!!*

सर्वोदय कला मंडळ औरंगाबाद

*छत्रपती प्राथमिक विद्यालय प्राथमिक विभागाचा (उन्हाळी सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम 1001 प्रश्नाचे टार्गेट, पहिली ते सातवी साठी उपयुक्त)*

चला सामान्य ज्ञान वाढवूया!!!!!
*आशीर्वाद*
स्व.कमळाबाई भिक्कन पाटील 
*संकल्पना व प्रेरणा*
मा. अध्यक्ष सुभाष पाटील साहेब
*मार्गदर्शन*
-मा. मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला व्यवहारे मँडम
*संकलन व निर्मिती*
- श्री.रामदास वाघमारे (सहशिक्षक)
*सुचना*-
दररोज पंधरा प्रश्न क्रमशः पाठवले जातील. त्याचा अभ्यास करावा व रविवारी ऑनलाईन चाचणी सोडवावी.
*अधिकारी व्हायचे मला!!*
*नाविन्यपूर्ण उपक्रम*
चला सामान्यज्ञान वाढवूया.......
दिनांक- 20/04/2023 वार-गुरूवार
१ला दिवस   क्रमशः...
१)प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
उत्तर -भंडारदरा
२) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते?
उत्तर -पंडू राजा
३) राधानगरी हे प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या शहरात आढळते?
उत्तर -कोल्हापूर
४) बाल शिवाजीने वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला?
उत्तर -सोळाव्या वर्षी
५) महाराष्ट्रात पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले?
उत्तर -गोदावरी
६) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरणाचे नाव काय?
उत्तर -गंगापूर धरण
७) महाभारतातील कौरवांच्या वडिलांचे नाव काय?
उत्तर -धृतराष्ट्र
८) भारताच्या कोणत्या भागात महाराष्ट्र राज्य आहे?
उत्तर -पश्चिम
९) महाडच्या गणपतीचे नाव काय?
उत्तर -वरदविनायक
१०) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर -सुमारे तीन लाख चौरस किलोमीटर.
११) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते?
उत्तर -चंद्रभागा
१२) महाराष्ट्रात "श्रीमंत मंदिर "कोणास म्हटले आहे?
उत्तर -शिर्डी साईबाबा मंदिर
१३) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?
उत्तर -तिसरा
१४) महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहेत?
उत्तर -मध्य प्रदेश
१५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता?
उत्तर -भंडारा
*संकलन व निर्मिती*
रामदास वाघमारे सर
सदर प्रश्नावली ब्लॉगवर उपलब्ध

*सहकार्य सर्व शिक्षक वृंद*
छत्रपती प्राथमिक विद्यालय गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर 

Friday, 17 December 2021

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे निकाल जाहिर

 

*राज्यस्तरीय निबंध लेखन पुरस्कार जाहीर*

(बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे हे पुरस्काराचे सहावे वर्ष)

औरंगाबाद / प्रतिनिधी   बोधी ट्री एज्युकेशनल  फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद  या शासन मान्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव मासिकाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील  शिक्षक बंधू भगिनींना आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत राज्य भरातून २८९  शिक्षकांनी सहभाग नोंदविला या पैकी खालील  निवड करण्यात आलेल्या स्पर्धेकाची यादी 
*प्रथम क्रमांक-* -
१) सौ प्रतिमा प्रशांत चव्हाण, कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल धुळे.
*विषय-* स्वच्छ भारत अभियान व आपण.

*द्वितीय क्रमांक-*
२) श्रीमती प्रियजा प्रवीण राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग.
*विषय-* एक पाऊल : स्वच्छतेकडे.

*तृतीय क्रमांक-* -
  ३)  सौ साबळे विद्या सुरज, श्री मार्कंडेय हायस्कूल सोलापूर.
*विषयः*- स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज.

*उत्तेजनार्थ क्रमांक-*

१) श्री राजेंद्र वराडे,
डॉ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय चाळीसगाव जळगाव.
*विषय:-*  "स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज".

२) श्री बंदसोडे जितेंद्र श्रीनिवास,
राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे तालुका पनूस जिल्हा सांगली.
*विषय:-* "स्वच्छ भारत अभियान आणि आपण".

३) श्रीमती सुरेखा एस. साठे,
भालतिलक सहशिक्षक डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूल जालना.
*विषय :-*  "मी... मी कचरा बोलतोय"

४) सायराबानू वजीर चौगुले, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलचवली.
*विषय:-*  "महाराष्ट्र संत आणि लोकजागृती स्वच्छतेची "

५) श्री राज मुधाळे, जि. प. प्राथमीक शाळा धनंज कें. सुजलेगाव ता. नायगाव जिल्हा नांदेड.
*विषय:-*  "एक पाऊल स्वच्छतेकडे ".

    या निवड झालेल्या स्पर्धेकाना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात औरंगाबाद येथे पुरस्कार देवून सपत्नीक सन्मानीत केले जाणार आहे. हा सोहळा दोन सत्रात पार पडणार आहे.अशा या पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षक बंधूभगीनींची नावे आहेत .
सर्वश्री रामदास वाघमारे अध्यक्ष, मीरा वाघमारे सचिव, ऋत्विक वाघमारे उपाध्यक्ष, प्रेरणा अझादे उपसचिव,अंन्सीराम वाघमारे कोषाध्यक्ष , राहुल जाधव, संदीप आझादे प्रणाली वाघमारे
  संस्थेच्या सचिव मिराताई वाघमारे यांनी अशी माहिती पत्राद्वारे कळविले आहे.
                         सचिव
                   मीरा वाघमारे
          मो. 8888125610