वाट पाहणारं प्रेमचं दार
*वाट पाहणारं प्रेमाचं दार*
प्रतेकाच्या जीवनात
कुणीना कुणी आसतं
खरच सांगतो त्या प्रेमाला
प्रेमं हे वाट पाहणार आसतं....
वाट पाहणाऱ्या प्रेमाचं
एक वेगळचं गाव असतं
गावातल्या प्रतेक घराला
एक मनाचं दार आसतं.....
मनाच्या उंबरठ्याआड
रोज प्रेम वाट पाहत आसतं
त्या प्रेमाला ना कधी
दुनियादारिचं भान असतं......
या दुनियादारीच्या चुघलीने
प्रेम रुसतं फुगतं रडत असतं
गैरसमजाच्या वाळविणं
प्रेम दूर दूर पळत असतं......
दूर दूर पळणा-या प्रेमासाठी
प्रेम अस्वस्थ होत असतं
आणि अश्रूच्या धारा सोबत
प्रेम व्यसनाधिन होत असतं.....
व्यासनाधिन आडकलेल्या
प्रेमाला प्रेमानीच सावरायचं असतं
अडखळणा-या पावलांना
प्रेमानीच सावरायचं असतं.......
सावरणा-या प्रेमानी फक्त
एकच काम करायचं आसतं
उभ्या आयुष्यात प्रेमाला
जीवापाड जपायचं असतं
जीवापाड जपताजपता
प्रेमाचं मन तोडायचं नसतं
तळ हाताच्या फोडा प्रमाणं
प्रेमाला जपायचं असतं......
खरच सांगतो मिञ हो
वाट पाहणारं आपलं
एक वेडं प्रेमं असतं
प्रतेकाच्या ह्दयात
कोरलेलं एक प्रेमाचं दार असतं.....
✍ रामदास वाघमारे
मो.नं. 8888125610
मन अधीर झाले
*तुला भेटण्यास मन अधीर झाले*
हळव्या माझ्या मनाला
सखे मी आताच सावरले
तुझ्या दुरजाण्याच्या आठवणीने
आज माझे मन गहिवरले....
काहीना काही सखे
असतो बघ तुझा बहाणा
रोज तुझी वाट पाहणारा
सखे मी आहे ग तुझा दिवाना....
फोनवर बोलण्यात सखे
आजीबात तुला वेळच नाही
उगाच काही तरी बहाना शोधून
म्हणे आज माझा मुडच नाही.....
तुझी वाट पाहता पाहता
सखे कैक दिवस निघून गेले
तप्त ऊन्हात गुलमोहराचे फुल
वाट तुझी पाहता सुकून गेले.....
आता नको ग तु दूर जावू
तनमन माझे बधीर झाले
ओढ लागली मिलनाची
तुला भेटण्यास मन अधीर झाले....
✍ रामदास वाघमारे
मो.नं.8888125610
भास
*भास*
जीवन गौरवच्या वाटेवरती
सखे मला भेटलीस
हरवलेल्या मनाला
समज तूच तर घातलीस.....
कोमेजलेल्या कळीला
साद तूच तर घातलीस
सुकलेल्या वेलीला
वाचा तुच तर फोडलीस....
वाहणाऱ्या आसवांना
आवर तुच तर घातलीस
मरून पडलेल्या देहाला
संजीवनीची फुंकर तुच तर मारलीस......
सुखात आणि दुःखत
साथ तुच तर दिलीस
गोठलेल्या भावनांना
वाचा तूच तर फोडलीस....
सरते शेवटी का होईना
साथ नाहीस सोडलीस
मुक्या भावनांना ख-याआर्थानं
वाचा तूच तर फोडलीस.....
शेवटी गोड तुझ्या आवाजाने
दिस माझा गोड जातोय
खारचं सांगतोय सखे तुला
तुझ्या मधूर बोलण्याचा भास मला होतोय......
रामदास वाघमारे
मो.नं.8888125610
फक्त तुझाच विचार
*फक्त तुझाच विचार*
सखे भावणेच्या भरामधी
खरेच मला काहीच नाही कळालं
माझ्या प्रत्येक शब्दातून आनंद नाही
तर तुला दुःखच सारं मिळालं....
सखे भावणेच्या भरामधी
तुला खुप काही बोललो
कालांतराने तुझ्या जागी येवून
विचार केला तर मीच माझा हरलो..
सतत सतत तुझ्या या आठवणीने
घर,दार,शाळा,अंगण येथा दिसतेत
जवळच माझ्या असून देखील
सखे तू मला दूर दूर कशी भासतेस...
सखे तुझी आठवण आली की
नुसता पोटात उठतो गोळा
रोज अंथरूणावर पडलो की
शपथ माझा लागत नाही ग डोळा....
उठून लेखनी हातात घेतली की
सखे चेहरा तुझाच दिसतोय
भरभरून कविता लिहिली की
राञभर तुझाच विचार घोळतोय...
कवि
रामदास वाघमारे
मो.नं. 8888125610
भास
*भास*
जीवन गौरवच्या वाटेवरती
सखे मला भेटलीस
हरवलेल्या मनाला
समज तूच घातलीस.....
कोमेजलेल्या कळीला
साद तूच घातलीस
सुकलेल्या वेलीला
वाचा तुच तर फोडलीस....
वाहणाऱ्या आसवांना
आवर तुच तर घातलीस
मरून पडलेल्या देहाला
संजीवनीची फुंकर तुच तर मारलीस......
सुखात आणि दुःखत
साथ तुच तर दिलीस
गोठलेल्या भावनांना
वाचा तूच तर फोडलीस....
सरते शेवटी का होईना
साथ नाहीस सोडलीस
मुक्या भावनांना ख-याआर्थानं
वाचा तूच तर फोडलीस.....
शेवटी गोड तुझ्या आवाजाने
दिस माझा गोड जातोय
खारचं सांगतोय सखे तुला
तुझ्या मधूर बोलण्याचा भास मला होतोय......
कवी
रामदास वाघमारे
मो.नं.8888125610
सखे तुला शोधू तरी कुठे
*शोधू तरी कुठे*
माझ्या कवितेची कवणे
सखे गाऊ तरी कुठे
वर्णावया तुझी महती
मी मांडू तरी कुठे....
भाषा तुझी साधी सुधी
या पृथ्वी तलावावर ऐकू तरी कुठे
मधूर तुझे ते बोलणे वागणे
सखे मी बसून ऐकू तरी कुठे....
तुझा रसिक मी सच्या
तुझे गाणे ऐकू तरी कुठे
कान माझे टवकारलेले
सखे तुझे बोल ऐकू तरी कुठे...
तुझा तो चेहरा पाहण्यासाठी
रोज तुला मी शोधू तरी कुठे कुठे
चंद्र ,तारे,सुर्य,शोधून झाले
तरी सखे तु दिसेना झालीस कोठे .....
कुणाची नजर लागली की काय
आच्यानक गायब झालीस तरी कुठे
रामदासाच्या प्रेमळ लेखनीने
सखे तुला शोधू तरी कुठे कुठे.....
कवि
रामदास वाघमारे
मो.नं.8888125610
प्रश्न ...?
प्रश्न ....?
सखे एक प्रश्न विचारु....⁉
आयुष्य आपले किती दिवसाचे आहे
आनंद प्रतेकाने घ्यावा
उगाच का नशिबाला आपल्या
उठ सुठ दोष द्यावा.......⁉
सखे एक प्रश्न विचारु.......⁉
हातावर माझ्या
तुझा हात पाहीजे
जीवात जीव असे पर्यत
सखे तुझी साथ पाहिजे.....⁉.
सखे एक प्रश्न विचारु.......⁉
तुझ्या या विरहाने
पापण्या भिजतात अनेकदा
डोळ्यातील पाण्याला
विचार जरा एकदा.....⁉
सखे एक प्रश्न विचारु......⁉
सखे बघ माझ्या डोळ्यांत
तुझेच ते प्रतिबिंब दिसेल
तुझ्या शिवाय माझ्या डोळ्यात
कोण बरे असेल......⁉
सखे एक प्रश्न विचारु......⁉
तळहाताच्या फोडा पेक्षाही
जपले आहे मी तुला,
कदाचित् चूकले असेल माझे
तर मोठ्या मनाने माफ केले
पाहीजे की नाही तु मला...⁉
सखे एक प्रश्न विचारु......⁉
छान बोलावे छान लिहावे
असे मनोमन वाटते ग
पण गैरसमज अँड येतो
म्हणून तर वाईट वाटते ग..⁉
सखे एक प्रश्न विचारु........⁉
स्वप्नात होतो मी
स्वप्नात जाग आली
काय सांगू सखे तुला
तुझीच आठवण आली....⁉
सखे एक प्रश्न विचारु......⁉
शेवट होण्यासाठी
थोडीच चारोळी लिहली
तुला उदंड आयुष्य लाभावे
म्हणून तर माझी लेखनी वाहीली....⁉
सखे एक प्रश्न विचारु........⁉
आज आठवणीत तुझ्या
आसवांची साथ होती
सखे तुझी चारोळी वाचतांना
आज आसवे वाहत होती....⁉
सखे एक प्रश्न विचारु........⁉
तुझ्या त्या गैरसमजाने
पुरता मी खचून गेलो
माझ्याच नजरेत मी
पार मरुन गेलो.......⁉
सखे एक प्रश्न विचारु........⁉
मैञीत तुझ्या आणि माझ्या
कधी दुरावा न येवो
अशीच आपली जोडी
सदैव हसत राहो......⁉
सखे एक प्रश्न विचारु.........⁉
सिता विना आधूरा
राम आज आहे
माधूरी माझी कुठे गेली
तीला मी शोधत आहे......⁉
कवी
✍ रामदास वाघमारे
मो.8888125610
राम तुझा दास गं....!
*राम तुझा दास गं*
राहत असलीस जरी तू दूर गं
तू जवळच असल्याचा होतो भास गं
सखे तुझ्या चरणी माझी
भक्ती झाली आज लीन गं......
अजिंठा लेणीतील तु अपसरा गं
त्या मुर्ती समान माझी भक्ती गं
सखे तुझ्या मुर्तीला मी
आज कमळ पुष्प अर्पिले गं....
वाट पाहतो देवा समान गं
एकदा या भक्ताला पाव गं
किती पाहसील अंत गं
नको खाऊस आज भाव गं.......
प्रेम माझे खरे गं
ध्यास फक्त तुझाच गं
सखे तुझ्या चरणाचा
*राम* तुझा *दास* गं.......
कवि
रामदास वाघमारे
मो.नं.888125610
*स्पर्धा साठी*
राम तुझा दास गं....!
*राम तुझा दास गं*
राहत असलीस जरी तू दूर गं
तू जवळच असल्याचा होतो भास गं
सखे तुझ्या चरणी माझी
भक्ती झाली आज लीन गं......
अजिंठा लेणीतील तु अपसरा गं
त्या मुर्ती समान माझी भक्ती गं
सखे तुझ्या मुर्तीला मी
आज कमळ पुष्प अर्पिले गं....
वाट पाहतो देवा समान गं
एकदा या भक्ताला पाव गं
किती पाहसील अंत गं
नको खाऊस आज भाव गं.......
प्रेम माझे खरे गं
ध्यास फक्त तुझाच गं
सखे तुझ्या चरणाचा
*राम* तुझा *दास* गं.......
कवि
रामदास वाघमारे
मो.नं.8888125610
*स्पर्श*
पहिलं वहिलं
ते माझ प्रेम
फोनवरून तुला कळविलेलं
हिमंत नव्हती
तुझ्या समोर बोलण्याची
आणि
तुझ्या हातात हात धरण्याची.....
अचानक बोलता बोलता
माझा हात
तुझ्या हाताला चूकून स्पर्श झालेला
तेंव्हा देहभर अंग माझे शहारलेलं
तेव्हा जीव कसा वेडा पिसा झालेला.....
सखे तुला आता विसरु शकत नाही गं
आज ही आठवातोय मला तो क्षण
तु रुसली असता , तुला विनवितांना
तुझा हात मी हातात हात धरतांना
आजही मला तो स्पर्श खुप काही
सांगून गेला
सखे तो स्पर्श तुला नसेल जानवत
म्हणून तर कवितेतून सांगतोय...
कवी
रामदास वाघमारे
मो.8888125610
*आठवण*
काय बरे असते आठवण
मनामनात चाललेला खेळ
कि....
डोक्यात चालणारे विचाराचे काहूर
सखे खरे सांगू
तुझी जर मला आठवण आली
की ...
मनाला वाटते हूरहूर
खरेच काय बरे असते ग ही आठवण
कुणी दूर असले तरी
जवळजवळ असल्याचा
भास जानवतो
वर्तमान काळात मन रमतांना
अच्यानक भुतकाळात मन नेते
आसी कसी ग ही आठवण ...
उठता बसता झोपतांना
फक्त नि फक्त तुझीच आठवण
साखर झोपेत स्वप्नं पाहणारी
ही आठवण
आसी कसी बरे असते ग
हि *आठवण*
कवी
रामदास वाघमारे
मो.8888125610
*साथ*
ते तारे तो चंद्र
नको ग मला
फक्त नि फक्त
तुझी साथ हवी ग मला....
हे फसवे जग
नको ग मला
फक्त नि फक्त
तु हवीस मला...
खरे सांगू
सखे आज तुला
तुझ्यातलं
जग हवय ग मला....
तुझा बंगला
तुझी गाडी
नको ग मला
फक्त नि फक्त
तुच हवीस मला...
स्वप्नं माझी
नाहीत ग मोठी
पण एक करसील
तुझ्या स्वप्नात
थोडी जागा देसील मला...
सखे जीव आडकलाय ग
माझा तुझ्यात म्हणून तर
भटक्या आत्म्या सारखा
जीव माझा झुरतोय
म्हणून च म्हणतोय
साथ देसील का ग मला......
कवी
रामदास वाघमारे
मो. 8888125610
सखे तुझ्या बद्दल
काय वर्णू मी काव्य
तुझं रुपच मला
दिसते नेहमी रचतांना काव्य
मला जे वाटतय
ते मी येथे मांडतोय
हे बघ सखे
या मनात काहीच
साठत नाही
माञ तुझ्या त्या
बाल आठवणी
काही केल्या पुसतच नाही...,
सखे खरे सांगू तुला
दिलखुलास तु हसतांना
तुझ्या सवे खुप हसावे वाटते
जसा
पोर्णीमेचा चंद्र उगवावा
तसे तुला रोज पाहावे वाटते....
सखे तुला मनातलं सांगतो
मी चूकीचा आहे की बरोबर
हे मलाच माझे काही कळेना
तु माझी कवीता वाचतांना
माझी लेखनी का बरं पुढे ढळेना...उत्तर देना..
कवी
रामदास वाघमारे
मो.8888125610
माझं प्रेम
हे एकतर्फीच होतं
तिला ते माहीत नव्हतं
आजही माझ प्रेम
एकतर्फीच आहे
तीला ते माहीत आहे
पण...
तिचं प्रेम नव्हतं
अस नव्हतं ...
तिला जेव्हा कळलं होतं
तेव्हा तीही आवाक होऊन
प्रेमात पडली...
जगाला न दिसण्या इतकं
तिचही प्रेम होतं
तिच्या जवळ
असून सुध्दा
खरेच तिला
यातलं काही कळत नव्हतं
मला तिच मन दिसत होत
अन्
तिला माझ मन दिसत होत
खरे सांगू मिञांनो
जेव्हा मी पाहीलं...
तेव्हा तिच्या
ह्दयात माझ्या जागी
दुसरेच कुणीतरी बसलेलं होतं....
आज ही ती माझी आहे
म्हणून वेड्यागत
तीची वर्षे नि वर्ष
वाट पाहत आहे......
कवी
रामदास वाघमारे
मो. 8888125610
एक तरर्फी प्रेमातून
एक तरर्फी प्रेमातून
सखे तुला चोरुन बघतांना
ती मजा काही औरच होती
तुला न कळत तुझ्या मागे
फिरण्याची मजा काही निराळीच होती....
सखे आज ते दिवस
पुन्हा परतुन येणे नाही
शाळा उघडत असतांना
त्या पावसात तुझे आज भिजणे नाही.....
जेव्हा पाऊस यायचा
तेव्हा तु डोक्यावर
वही पुस्तके धरुन
तुझ्या मैञीनी सोबत
तु चालायचीस
तेव्हा माझे मिञ अन् मी
म्हणजे एकतर्फी प्रेम करणार
मजनू...!
डोक्यावरती ना छञी ना कुठले पुस्तक
तेव्हा ओलाचिंब पावसात भिजत
तुझ्या रस्त्यावर पाठमोरा चालायचो...
तुझ्या त्या लाज-या नजरेकडे पाहून
मन कसं प्रसन्न व्हायचं
तुझ्या पाठीमागे दुर उभा राहून
तुला न्याहळतांना
जी मजा होती ती काही औरच होती..,..
आणि तुला सांगू
तासन् तास तु येण्याअगोदर
तुझी वाट पाहत थांबायचो
तु दिसली नाहीस की मी
उदास व्हायचो...!
अन् पुढे पुढे तुझ्या घराकडे चालायचो.....
त्या जून महिन्यातील पाऊस
माञ खुप हुशार होता
तु शाळेच्या बाहेर चालायला
लागलीस की धोधो पडायचा
आणि तु त्या समोरच्या
भिंती आडउभी राहायचीस
मग काय बुआ...
पाऊस थांबे पर्यत मी तुलाच
न्याहळत उभा राहायचो.....
सखे तुला सांगू
मला तुला खुप बोलावे वाटायचं
पण..
हिम्मत नव्हती होत,
तुला बोलायची
मिञ म्हणायचे
काय डरपोक आहेस राम्या
पण
मी कधीच तुला बोलायचे धाडस केले नाही
कारण माझे मन माञ
तुला दुरुनच पाहण्यात
आनंद मानायचे......
कवी
रामदास वाघमारे
मो.8888125610
*तुझे असे वागणे कळत नाही*
आजकाल मला कळत नाही
का तु असे वेड्यागत वागतेस
मध्येच मला सोडून जातेस
आणि परत वापस येतेस...
का छळतेस असे मजला
काय केला मी असा गुन्हा
चूकले असेल माझे तर
माफ कर मला पुन्हा पुन्हा ....
तुझे असे वागणे काही
स्पष्ट लक्षात येत नाही
याचा अर्थ असा समजू नकोस
कि मला काहीच कळत नाही....
काहीच कळत नाही मजला
स्पष्ट तुला माझे हे सांगणे.
ओठात एक तर मनात एक
तुझे असे हे वागणे.....
खरे सांगतो तुला
हे गाव हे नाव फक्त ,
तुझ्यासाठीच तर आहे
का तुला कळत नाही
माझे जीवन तुझ्या साठीच आहे...
कवी
रामदास वाघमारे
मो.8888125610