~निमंत्रण पञिका~
राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड , पुणे
Monday, 28 May 2018
Wednesday, 23 May 2018
पुस्तक परीक्षण समिक्षक श्रीमती राजश्री पल्लेवाड, श्री संदीप ढाकणे
पुस्तक परीक्षण , "समिक्षक "श्रीमती राजश्री पल्लेवाड, श्री संदीप ढाकणे
*📚पुस्तक परीक्षण 📚*
*✍�...अत्यंत महत्त्वाचे* .
*जीवन गौरव* शैक्षणिक व सामाजिक मासिकात नवोदित लेखक व कवी यांच्या पुस्तकाची राज्यभर ओळख व्हावी.या उद्देशाने आम्ही महाराष्ट्रातील गुरुमाऊलींच्या पसंतीस पडलेले मासिक जीवन गौरव ,या मासिकात
*पुस्तक-परिक्षण* हे सदर सुरू आहे.
तरी इच्छूक कवी व लेखकांनी आपली पुस्तके (काव्यसंग्रह,कथासंग्रह,चरित्र,कादंबरी इत्यादी)
*दोन प्रतीत खालील पत्यावर पाठवावे.*
-----------------------
📩 संपादक
श्री.रामदास वाघमारे *जीवन गौरव*
प्लाँट नं.२७, आनंद नगर, आम्रपाली बुध्दविहाराच्या बाजूला, गारखेडा परिसर, औरंगाबाद .431009
*मासिक "जीवन गौरव" चे सभासद व्हा......!!!*
*✍� आपले पुर्ण नाव:*
*✍� आपला पुर्ण पत्ता :*
*☎ आपला फोननंबर :*
*जीवन गौरव संपादक मंडळींना अवश्य कळवा.*
*वार्षिक सभासदत्व : 250/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व : 500/-रू*
*आजीव सभासदत्व : 3000/-रू*
*संस्थेसाठी : 4000/-रू*
------------------------
*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*
*📚 संपर्क जीवन गौरव*
*💎 मा.श्री. संदीप ढाकणे* *सहसंपादक , औरंगाबाद जिल्हा*
'
*📱मो.नं. 7588512467*
💎 मा.श्री. रामदास वाघमारे,औरंगाबाद
*📱 8888125610*
*✍� email: jeevangaurav76@gmail.com*
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*
Tuesday, 15 May 2018
जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी राजन लाखे यांची निवड...
जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी
राजन लाखे यांची निवड...
दैनिक दिव्य मराठी , जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा
पुणे-३३ यांच्या संयुक्त विद्यमाने खास पर्यावरण
दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.५ जून २०१८ रोजी पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पहिल्या शिक्षक साहित्या संमेलनाध्यक्षपदी कवीवर्य राजन लाखे यांची
जीवन गौरव मासिक संपादक मंडळच्या वतीने
एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी
ती स्विकारली आहे. अशी माहिती जीवन गौरव
मासिक पुणे जिल्हा सहसंपादक तथा साहित्य संमेलन मुख्य आयोजक दिगंबर शिंदे यांनी
प्रसिद्धीस दिली आहे. यावेळी प्रमुख संपादक
रामदास वाघमारे, उप. संपादिका राजश्री पल्लेवाड, कार्य. संपादक संदीप सोनवणे,उप
कार्य.संपादिका मिरा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते....
विशेष म्हणजे या आधी अनेक लहान
मोठ्या साहित्य संमेलनांचे,कवीसंमेलनांचे त्यांनी अध्यक्षस्थान भुषविले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील "कवीकट्टा" या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी मा. कवीवर्य राजन लाखे यांची निवड संयोजक समितीवर सलग तीन वेळा झाली आहे. साहित्य आणि साहित्यिक चळवळीसाठीच ते
पूर्णपणे काम करत असून अनेक नाविण्यपूर्ण
उपक्रमातू साहित्यिक घडविण्याचे काम ते आगदी निर्व्याजपणे करीत आहेत. कवी व कविता हे त्यांचे विश्व असून ते या कार्यासाठी
सतत झटत असतात.
राजन लाखे हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिं.चिं.शाखेचे अध्यक्ष व पुणे जिल्हा प्रतिनिधी आहेत.तसेच नुकतीच त्याची निवड
मराठी भाषा संचलनालयावर मराठी भाषा तज्ज्ञ म्हणून झालेली आहे.
असे जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे कळविले आहे
Tuesday, 1 May 2018
शिक्षक साहित्य संमेलन पुणे
*नम्र निवेदन*
*जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य* व *महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*पहिले शिक्षक साहित्य संमेल पिपरी चिंचवड
२०१८* मध्ये सहभागी होण्यासाठी *जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य संलग्न सर्व सभासद शिक्षक बंधू-भगीनींना नम्र आवाहन करण्यात येत आहे....
१) सदर संमेलन हे एकदिवसाचे असून सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० अशी संमेलन वेळ
राहील.
२) सदर संमेलन हे दि. ५जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून घेण्याचे प्रस्तावित आहे.
२) सदर संमेलनामध्ये परीसंवाद व कवीसंमेलन
या दोन बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
*जास्तीत जास्त वेळ हा कवीसंमेलनासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे*प्रत्येक कवीली
आपली रचना सादर करता येईल.
३) महाराष्ट्र राज्यातील सर्व कवि लेखक नाव नोंदवू शकतात.
४) नाव नोंदणी शुल्क हे जीवन गौरव संपादक,
उपसंपादक व सर्व पदाधिकारी सहसंपादक यांचेसाठी प्रत्येकी १०००रू (मदतनिधी म्हणून) ठेवण्यात आलेले आहे व इतर सहभागी शिक्षक बंधूं-भगीनींसाठी ३०० रू ठेवण्यात आले आहे.
५) सदर संमेलनात सहभाग हा फक्त१५० ते २०० सहभागींनाच दिला जाणार आहे.त्यामुळे
*प्रथम नोंदणी प्रथम संधी* याची सर्वांनीच नोंद
घ्यावी.नोंदणी दि.१५.४.२०१८ ते दि.१५.५.२०१८ पर्यंत चालू राहील.
६) सदर संमेलनात प्रत्येक सहभागींना आकर्षक सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाईल.
७) संमेलनस्थळी चहा व दुपारच्या जेवणाची सोय आयोजकांकडून केली जाईल.
८) निवासव्यवस्था ज्याने- त्याने आपापल्या वैयक्तिक पातळीवर करून कार्यक्रम स्थळी सकाळी.ठिक १०.१५ वाजता उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
९) आपली नावनोंदणी करण्यापूर्वी आपले सहभाग शुल्क पुढील भारतीय स्टेट बँक खाते
क्र.35253386279 IFSC:SBIN0016435 भरलेले असावे.
*होड्डर नेम अथर्व दिगंबर शिंदे या नावे पैसे जमा करावेत*
१०) नोंदणीकृत गुरूमाऊलींनाच संमेलनात सहभाग घेता येईल.
११) नोंदणी पुणे जिल्हा सहसंपादक दिगंबर शिंदे मो.न. 8983369430(whatsapp)वर करणे आवश्यक आहे.
१२) आपल्या स्वइच्छेने लवकरात लवकरच सहभाग नोंदवा व एका सुंदर क्षणाचे मानकरी
व्हा...ही विनंती...
संपादक
रामदास वाघमारे
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
मो. 8888125610