Tuesday, 15 May 2018

जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी राजन लाखे यांची निवड...

जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी 
राजन लाखे यांची निवड...

  दैनिक दिव्य मराठी ,  जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा
पुणे-३३ यांच्या संयुक्त विद्यमाने खास पर्यावरण
दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.५ जून २०१८ रोजी पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पहिल्या शिक्षक साहित्या संमेलनाध्यक्षपदी कवीवर्य राजन लाखे यांची
जीवन गौरव मासिक संपादक मंडळच्या वतीने
एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी
ती स्विकारली आहे. अशी माहिती जीवन गौरव
मासिक पुणे जिल्हा सहसंपादक तथा साहित्य संमेलन मुख्य आयोजक दिगंबर शिंदे यांनी
प्रसिद्धीस दिली आहे. यावेळी प्रमुख संपादक
रामदास वाघमारे, उप. संपादिका राजश्री पल्लेवाड, कार्य. संपादक संदीप सोनवणे,उप
कार्य.संपादिका मिरा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते....
              विशेष म्हणजे या आधी अनेक लहान
मोठ्या साहित्य संमेलनांचे,कवीसंमेलनांचे त्यांनी अध्यक्षस्थान भुषविले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील "कवीकट्टा" या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी मा. कवीवर्य राजन लाखे यांची निवड संयोजक समितीवर सलग तीन वेळा झाली आहे. साहित्य आणि साहित्यिक चळवळीसाठीच ते
पूर्णपणे काम करत असून अनेक नाविण्यपूर्ण
उपक्रमातू साहित्यिक घडविण्याचे काम ते आगदी निर्व्याजपणे करीत आहेत. कवी व कविता हे त्यांचे विश्व असून ते या कार्यासाठी
सतत झटत असतात.
         राजन लाखे हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिं.चिं.शाखेचे अध्यक्ष व पुणे जिल्हा प्रतिनिधी आहेत.तसेच नुकतीच त्याची निवड
मराठी भाषा संचलनालयावर मराठी भाषा तज्ज्ञ म्हणून झालेली आहे.
          असे जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे कळविले आहे

No comments:

Post a Comment