राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा २०१८
Monday, 15 January 2018
Friday, 12 January 2018
Thursday, 11 January 2018
जीवन गौरवचे सभासद व्हा....
फ्रेश बुलेटिन ....
*💎जीवन गौरव शैक्षणिक मासिक*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*✅🎯 मासिक जीवन गौरवसाठी वार्षिक वर्गणी /जाहिरात शुल्क किंवा देणगी पाठविण्यासाठी देशभरातील कुठल्याही बँक आँफ महाराष्ट्राच्या शाखेत पुढील खाते क्रमांकात जीवन गौरव* *च्या नावाने रक्कम जमा करता येते*.
*वार्षिक सभासदत्व : 250/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व : 500/-रू*
*आजीव सभासदत्व : 3000/-रू*
*संस्थेसाठी : 4000/-रू*
*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*
*बँक खाते होल्डर नाव जीवन गौरव.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✅ पोस्टाने मनिआँर्डर पाठविण्यासाठी पत्ता*
📩 संपादक
श्री.रामदास वाघमारे *जीवन गौरव*
प्लाँट नं.२७, आनंद नगर, आम्रपाली बुध्दविहाराच्या बाजूला, गारखेडा परिसर, औरंगाबाद .431009
*मासिक "जीवन गौरव" चे सभासद व्हा......!!!*
*✅ संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा
*☎ 8888125610*
*☎ 9403751806*
*✍ जीमेल:-*👉 jeevangaurav76@gmail.com
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक* *परिवर्तनाचा जीवन गौरव......!*
Wednesday, 10 January 2018
Tuesday, 9 January 2018
राज्यस्तरीय जीवन गौरव सोहळा संपन्न
*राज्यातील ३२ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान*
*( शिक्षक रामदास वाघमारे यांचा अभिनव उपक्रम; स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, पुस्तक देऊन शिक्षकांना केले सन्मानित )*
*औरंगाबाद (प्रतिनिधी)* येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे वितरण ७ जानेवारी राेजी करण्यात अाले. यात राज्यातील ३२ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात अाले. विशेष म्हणजे डाेळ्याचे पारणे फेडणाऱ्या या साेहळ्यास राज्यभरातील शिक्षक माेठ्या संख्येने अाले हाेते.
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे वितरण साेेहळा रविवारी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृहात थाटात पार पडला. उद्घाटक म्हणून डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव प्रा. डाॅ. देगावकर हे हाेते. तर अध्यक्षस्थानी भास्कराचार्य प्रतिष्ठाणचे सचिव प्रा. साेमनाथ वाघमारे हे हाेते. व्यासापीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जालिंदर शेडगे, रामराव पल्लेवाड, प्रविणे बाेराडे, संजय हिगाेलीकर, जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, डाॅ. संदीप तुपे, मीरा वाघमारे, संदीप साेनवणे, कल्पना फुसे उपस्थित हाेते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, पुस्तक देऊन शिक्षकांना गौरविण्यात येणार अाहे. शिक्षकांच्या सन्मानावेळी तंत्रस्नेही जयदीप डाकरे व उमेश खाेसे यांनी तयार केली शिक्षकांच्या कार्याची माहिती माेठ्या पडद्यावर दाखविण्यात अाली. त्यामुळे पुरस्कारार्थी शिक्षकांच्या कार्याची अाेळख संपूर्ण सभागृहाला झाली. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने हा कार्यक्रम झाला. सभागृहातील प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमाचे काैतुक करीत हाेता. वीणा...... यांनी रेखाटलेली भव्य रांगाेळी डाेळ्यात भरणारी हाेती. स्वागत गीत हे भानुदास रामोळे, दिनेश वाडेकर यांनी गायले. संदीप ढाकणे ,प्रा. सतीश म्हस्के व भाग्यश्री इसलवार मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. तर गणेश सुलताने यांनी अाभार मानले.
*पत्नीचे मंगळसूत्र विकूण केला सन्मान*
कार्यक्रमाचे अायाेजक तथा जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी सांगितले की, अाजच्या पुरस्कारामुळे निश्चितच सत्कारार्थी गुरूमाऊलींची त्याच्या गावात मान उचविणार अाहे. तसेच त्यांना स्फूर्ती मिळून ज्ञानदानाचे कार्य अधिक चांगल्या पध्दतीने हाेईल हेच माझे समाधान अाहे. अाजच्या साेहळ्यासाठी माझ्याकडे पैसे कमी हाेते. त्यावेळी माझ्या संपादकीय टिमने गाेळा करुन मला दिले. तसेच मी पदरमाेड करून स्वत:चा पगार एवढेच नव्हे तर पत्नीचे मंगळसूत्र माेडून पैसा उभा केला. ती माझी धडपड अाज १०० टक्के यशस्वी झाल्याने मी धन्य झाले असे म्हणाले त्यावेळी अनेकांच्या डाेळ्यात पाणी तराळले हाेते.
*अभिमानस्पद उपक्रम*
अाजच्या स्वरार्थी युगात शेजारच्या मुलांने जरी यश मिळविले तर त्यांचे काैतुक करण्यास अापण मागे पुढे करताे; पण स्वत: पदरमाेड करून असा दिमाखदार साेहळा घडवून अाणे तसेच कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता शिक्षकांना सन्मानित करणे हे खूप महान कार्य रामदास वाघमारे व त्यांची टिम करत असून ही बाब खराेखर अभिमानस्पद असल्याचे भाव उद्गार प्रमुख पाहुण्यांनी अापल्या भाषतातून काढले.
*यांना मिळाला पुरस्कार..*
दिलीप भगवान जाधव (शिवाजी हायस्कूल, औरंगाबाद), निशा देविदासराव कुलकर्णी (मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा, औरंगाबाद), सविता गोविंदराव राठोड (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, औरंगाबाद), शंकर नामदेव गच्चे (जि.प.शाळा लिंबोणी, जालना), विशाल वामन गुजर (बालाजी विद्यालय, वालसावंगी, जालना), शेख महेमुद अमिनोद्दीन (राजीव गांधी हायस्कूल, ताडबोरगांव, परभणी), तुकारामसिंह बैस (जि.प.शाळा बाचोटी, नांदेड), सुप्रिया दामोदर दापके (जि.प.शाळा चिंचोर्डी, हिंगोली), मीरा रामहरी गुळभिले (जि.प.शाळा कुंबेफळ, बीड), सोपान जयसिंग पवार (विद्याभवन हायस्कूल कळंब, उस्मानाबाद), माधुरी छगनराव वलसे (जि.प.शाळा शासकीय वसाहत, लातूर), सविता जयंतराव धर्माधिकारी (जि.प.शाळा वरवंटी, लातूर), मेधा महेश कानिटकर (संत ज्ञानेश्वर विद्यालय कोथरुड, पुणे), माधुरी प्रमोद वेल्हाळ (जि.प. प्रा.शाळा रायवाडी, पुणे), शीतल अभिमन्यू निमकर (जि.प.शाळा करकंब, सोलापूर), जयमाला सुभाष चव्हाण (जि.प.शाळा सोनगांव, सातारा), महादेव आनंदा हवालदार (जि.प.शाळा बांबवडे, सांगली), प्रा.सुषमा अरुण पाटील (एम आर मा.व .उ.शाळा गडहिंग्लज, कोल्हापूर), अनघा रमेश सावर्डेकर (जि.प.शाळा शेलारवाडी, रत्नागिरी), दत्तात्रय गणपत शिंदे (शांतीकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा, पालघर), अर्चना प्र.खोब्रागडे (जि.प.शाळा बोरीअरब, यवतमाळ), संदीप कृष्णा जाधव (जि.प.शाळा देवघर, रायगड), अलका विष्णू धाडे (जि.प.शाळा पारखेडा, बुलढाणा), नरेंद्र पांडुरंग चिमणकर (सावित्रीबाई फुले शाळा, अकोला), भानुदास दगडू रामोळे (जि.प.शाळा एकतोडपाडा, नंदुरबार), वर्षा आबासाहेब अहिरराव (या.दे.पाटील माध्यमिक विद्यालय, मेहरुण, जळगाव), शीतल सुनील बडगुजर (स.न.झंवर विद्यालय, पाळधी, ता.धरणगाव, जि.जळगाव), अर्चना राजेंद्र सोनवणे (जि.प.शाळा जुनी सांवगी, धुळे), नामदेव लक्ष्मण बेलदार (जि.प.शाळा वेळूंजे, नाशिक), अनुराधा रघुनाथ तारगे (जि.प. प्रा.शाळा गवळवाडी, नाशिक), वैष्णवी प्रकाश कापसे (संस्कार विद्यासागर इंग्लिश स्कूल देवनगर, नागपूर), जयराम श्रीरंग सातपुते (जि.प.प्रा.कें.शाळा तिसगांव, अहमदनगर).